अजित पवार इमानदारीने काम करतात, पण त्याची जाहीरात कधीच करत नाहीत; नाना पाटेकरांनी केलं कौतूक

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. राजकीय असो किंवा मनोरंज क्षेत्र असो ते आपल मत रोखठोक पणे मांडताना दिसतात. अनेक सामाजिक कार्यांमध्ये काम करत असताना ते राजकारणाविषयी देखील बोलताना दिसतात. (naana paatekar praises ajit pawar in pune he is a good leader)

आज पुण्यातील सर्किट हाऊस येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना नाना पाटेकर भेटले. याभेटीनंतर नानांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नानांनी अजित पवारांच्या कामांचे कौतुक केले. तसेच अजित पवार ज्या पद्धतीने काम करतात ते आपल्या कामाची कधीच जाहिरात करत नाहीत. ते आपलं काम करत राहतात, असे नाना पाटेकर यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘अजित पवारांची एखादी चुकीची गोष्ट तेवढीच अधोरेखित होत राहते. त्यांनी केलेलं काम हे समोर यायला पाहिजे. ते एक चांगला नेता आहेत. राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला जितकी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही. आम्ही अगदी छोटसं काम जरी केलं तरी तुम्ही खूप मोठं दाखवता आणि सरकारने केलेल्या कामाची किंमत राहत नाही हे असे असता कामा नये, असे स्पष्ट मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, पुढे बोलताना नाना पाटेकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर भाष्य केले आहे. ‘मला असं वाटतं पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्ष कोणीही तिकीट देऊ, मग पहा नका कुणीही पक्ष बदलणार नाही. तिथे काहीतरी नियम असायलाच पाहिजे, असे परखड शब्दात नानांनी मत व्यक्त केले.

याचबरोबर निवडणूक लढवण्यासाठी किमान शिक्षणाची अट असायलाच पाहिजे. मला नोकरीला जायचं असेल तर तिथे शिक्षणाची आणि वयाची अट आहे. शासकीय अधिकारी हे सर्व शिक्षित आहेत. परंतु अभिनयाच्या आणि राजकारणाच्या क्षेत्रात वयाची आणि शिक्षणाची अट नाही, असंही नाना पाटेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
रोहित राऊत-जुईली जोगळेकरला लागली हळद; पहा क्यूट कपलचे क्यूट फोटो
मित्र करत होता पत्नीवर बलात्कार, पती देत होता घराबाहेर पहारा, महाराष्ट्र हादरला
“मी तुमचा कट्टर कार्यकर्ता पण तुम्ही ऊसाचे बिल न दिल्याने माझा भाचा तडफडून मेला”
कोरोनामुळे नोकरी गेली, ३ इंजिनीअर मित्रांनी सुरू केला चहाचा स्टॉल, आतात करतात बक्कळ कमाई