सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या कार्यकाळाचा काल शेवटचा दिवस होता. याच निमित्ताने काल एन. व्ही.रमणा कार्यपीठाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘मला माफ करा’ असे म्हणत खंडपीठात माफी मागितली. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
एन.व्ही. रमणा यांचा शुक्रवारी कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे त्यांनी कार्यपीठाला संबोधित केले. म्हणाले, मी १६ महिन्यांत केवळ ५० दिवस प्रभावी आणि पूर्णवेळ सुनावणी केली, तसेच माझ्या कार्यकाळात लवकर सुनावणीसाठी सूचीबद्ध प्रकरणे घेण्यावर लक्ष केंद्रित करू न शकल्याबद्दल ‘मला माफ करा’ असे म्हणत खंडपीठात माफी मागितली.
एन.व्ही. रमणा यांच्या या विधानामागील अर्थ म्हणजे कोर्टरूममध्ये मागील ३ महिन्यांत पूर्णपणे फिझिकल सुनावणी दरम्यान झालेल्या सुनावणीबाबात होता, असं मानलं जात आहे. कारण, त्यांच्या कार्यकाळात बहुतांश वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.
म्हणाले, ‘मी खटल्यांची यादी आणि पोस्टिंगवर अधिक लक्ष केंद्रित करू शकलो नाही, याबद्दल मला खेद आहे’.एन. व्ही.रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून आठ वर्षे काम केले. तर, सरन्यायाधीश म्हणून गेल्या १६ महिन्यांपासून भारताच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व केले.
दरम्यान, रमणा जेव्हा अखेरच्या खंडपीठाचं कामकाज करण्यासाठी बसले तेव्हा सर्वच भावूक झाले होते. ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे इतके भावूक झाले की त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यांच्या भाषणावेळी अनेकदा त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रूंच्या धाराही वाहल्या होत्या.
रमणा यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक न्यायाधीशांची नियुक्ती केली. एन. व्ही. रमणा यांच्या निर्भीड भाषणशैलीमुळे लोक त्यांना ‘स्पीच जस्टिस ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखतात.