Share

‘या’ गावात लाल साडी नेसलेली नवरी व्हायची गायब, राक्षसाने निर्माण केली होती दहशत, कोण होता तो?

एक गाव होतं जिथे नवरीने लाल रंगाची साडी नेसली की लगेच गायब व्हायची. भूत या खास दिवसाची वाट पाहत असे जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होईल आणि ते वधूला लाल रंगाच्या साडीत उचलेल. या गावातील मुलींना लग्नाची भीती वाटत होती. होय, हे खऱ्या आयुष्यात घडले नसून रील लाइफमध्ये १९९५ मध्ये घडले आहे.(Jani Dushman, Navri, Jwala Prasad, Navvadhu)

ही कथा १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जानी दुश्मन’ चित्रपटाची आहे. मोठ्या स्टारकास्टने सजलेला हा चित्रपट हिट ठरला होता. चित्रपटात दाखवण्यात आले होते की, ज्वाला प्रसादला त्याच्या स्वप्नातील मुलीशी लग्न करायचे होते. लग्नाच्या दिवशी त्याच्या पत्नीने लाल रंगाची साडी परिधान केलेली असते. ती त्याच्या दुधात विष मिसळते आणि ज्वाला मरण पावतो. त्यानंतर ज्वाला  भूत बनतो आणि संपूर्ण प्रदेशात दहशत निर्माण करतो.

तो लाल रंगाची साडी परिधान केलेल्या नववधूंचे अपहरण करायचा आणि तिची हत्या करायचा. जेव्हा एका वराला (नवरदेवाला) सैतानाचा सामना करावा लागतो तेव्हा सैतान त्याला मारतो आणि त्यानानात्र सैतान ज्वाला प्रसादचे शरीर सोडून त्याच्या शरीराचा ताबा घेतो. वर्षांनंतर राक्षस दुसर्‍या माणसाच्या शरीराचा ताबा घेत असे.

एकामागून एक नववधू मारल्या जातात आणि कोणाला काहीच कळत नाही. गावातील पुजारी, ठाकूर, त्यांचा मुलगा आणि इतर अनेक जण संशयास्पद दिसतात. हा चित्रपट त्या काळातील अतिशय लोकप्रिय चित्रपट होता. त्याची सर्व गाणी विशेषतः ‘चलो रे डोली उठाओ कहार’ खूप लोकप्रिय झाले आणि आजही लोकांना त्याची गाणी आवडतात.

चित्रपटाची सुरुवातीची दृश्ये खूपच भीतीदायक आणि सस्पेंसपूर्ण होती. या चित्रपटात संजीव कुमार ठाकूरच्या भूमिकेत होते. त्याचवेळी या चित्रपटात जितेंद्र, सुनील दत्त, प्रेमनाथ, शत्रुघ्न सिन्हा, विनोद मेहरा, रीना रॉय, नीतू सिंग, रेखा, योगिता बाली, बिंदिया गोस्वामी, रझा मुराद, सारिका, अमरीश पुरी, शक्ती कपूर आणि अरुणा इराणी यांसारखे कलाकार होते.

महत्वाच्या बातम्या-
आरं तू माणूस हाय का सैतान! १३ फूट मगरीची शिकार करून खाल्ल तिचं ४०० किलो मांस
त्याने वर्गात प्रवेश केला आणि दोन मुलींचे कपडे फाडून.., शाळेतील घटना वाचून हादरून जाल
गीता वाईट आहे बायबल वाचा शिक्षक हिंदू मुलांना जबरदस्तीने करायला लावायचा येशूची प्रार्थना, द्यायचा ही शिक्षा
‘शिवसेनेनं सोमय्यांना ठार मारण्याचा प्लॅन आखला होता’, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप

ताज्या बातम्या इतर बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now