Share

ताजमहालाचे रहस्य उलगणार! वर्षानुवर्षे बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्यासाठी हायकोर्टात याचिका

ताज महाल ही जगातली एक प्रसिद्ध वास्तू आहे. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये या वास्तूचा समावेश होतो. हाच ताजमहाल सध्या पुन्हा चर्चेत आला आहे याचं कारण आहे भाजपच्या प्रवक्त्याने केलेली याचिका.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात ताजमहालच्या २२ कुलूपबंद दरवाज्यांची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे जेणेकरून तेथे हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती शोधता येतील.

यासाठी सत्यशोधक समिती स्थापन करावी आणि एएसआयने आपला तपास अहवाल न्यायालयासमोर सादर करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.  ताजमहालच्या या बंद दरवाज्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती बंदिस्त आहेत, असा याचिकाकर्त्याचा दावा आहे.

या याचिकेत असेही म्हटले आहे की,
ही समाधी जुने शिवमंदिर असल्याचा दावा काही इतिहासकार आणि हिंदू गट करतात.
याचिकेत म्हटले आहे की, “काही हिंदू गट आणि प्रबुद्ध संत दावा करतात की ही समाधी एक जुने शिवमंदिर आहे आणि त्यांच्या दाव्याला अनेक इतिहासकारांनीही समर्थन दिले आहे.  मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला हा ताजमहाल आहे असे अनेक इतिहासकारांचेदेखील मत असले तरी काही लोक तेजो महलया उर्फ ​​ताजमहाल हे ज्योतिर्लिंग असल्याचेही मानतात.

याचिकेत पुढे असेही म्हणण्यात आले आहे की, ४ मजली इमारतीच्या वरच्या आणि खालच्या भागात असणाऱ्या  सुमारे २२ खोल्या या कायमस्वरूपी बंद आहेत. आणि पीएन ओक यांसारखे अनेक इतिहासकार आणि करोडो हिंदू उपासकांचा असा विश्वास आहे की या कायमस्वरूपी बंद खोल्यामध्ये भगवान शिवाचे मंदिर आहे.

थोडक्यात ताजमहाला विषयी
जगातील सात आश्चर्यापैकी ताजमहाल ही  एक वास्तु आहे. ताजमहालाची भव्यता आणि सुंदरतेमुळे तो जगभरात ओळखला जातो. ताजमहल पांढऱ्या संगमरवरपासून बनवण्यात आला आहे. ताजमहाल हे भारतातील उत्तर प्रदेश मधील आग्रा ह्या शहरात यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. ताजमहाल म्हणजे सफेद रंगाची उत्कृष्ट आणि कलाकृती असलेली इमारत आहे. ही इमारत मोगल बादशाह शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ १६३२ ते १६५३ दरम्यान बांधली होती. मुमताज ही शहाजहानला त्याच्या इतर पत्नींपेक्षा प्रिय होती. आपल्या १४ व्या पुत्राला जन्म देताना तिचा मृत्यु झाला आणि तिच्या आठवणीत ताजमहाल उभा राहिला. या इमारतीच्या बांधकामाला पूर्ण होण्यास एकूण २१ वर्षांचा कालावधी लागला. ताजमहालाचे काम करण्यासाठी एकूण २० हजार कामगार होते असंही इतिहासात सांगितलं जातं.
महत्वाच्या बातम्या
‘आई कुठे काय करते?’ फेम मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावूक; म्हणाले, ती नेहमी म्हणत असे की..
‘आई कुठे काय करते?’ फेम मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावूक; म्हणाले, ती नेहमी म्हणत असे की..
“राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही”
महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला सल्ला; म्हणाले, वसंत तु…   

ताज्या बातम्या इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now