इजिप्शियन ममीच्या पोटात सापडलेल्या गर्भाचे गूढ उकलले, २००० वर्ष कसा राहिला सुरक्षित?

इजिप्तमध्ये(Egypt) एका ममीच्या पोटात २८ महिन्यांच्या एक रहस्यमय भ्रूण सापडला होता, पण आता शास्त्रज्ञांनी या भ्रूणाचे रहस्य उकलले आहे. गेली २००० वर्षांपासून हा गर्भ ममीच्या पोटात जतन केला गेला होता. २०२१ मध्ये त्याचा शोध लागल्यापासून ते शास्त्रज्ञांसाठी एक गूढच बनले होते. ही इजिप्तची पहिली गर्भवती ममी असल्याचे मानले जात आहे.(mystery-of-fetus-found-in-egyptian-mummys)

या ममीचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू झाला असावा, असा दावा संशोधकांनी केला आहे. या ममीला संशोधकांनी ‘रहस्यमय स्त्री’ असे नाव दिले आहे. सीटी स्कॅनद्वारे या ममीच्या गर्भाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. शरीर छिन्नविछिन्न झाल्यानंतर हा भ्रूण आम्लीकरण म्हणजेच अ‍ॅसिडिफिकेशनद्वारे (Acidification) संरक्षित करण्यात आल्याचे आता सांगण्यात येत आहे. ही प्रक्रिया लोणची साठवण्यासारखीच आहे.

संशोधकांच्या टीमने एप्रिल २०२१ मध्ये गर्भाची तपासणी करण्यासाठी ममीचे सीटी स्कॅन आणि एक्स-रे केले. यानंतर शास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञ अचंबित झाले. एका संशोधकाचे म्हणणे आहे की, आतापर्यंत जगात गर्भवती ममी सापडली नव्हती. आता यामुळे प्राचीन इतिहास समजून घेणे सोपे होणार आहे.

ममीच्या सीटी स्कॅनमध्ये असे समोर आले आहे की, गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तेव्हा गर्भ तिच्या पोटात असावा. २००० वर्षांपूर्वी बनवलेल्या ममीमधील भ्रूण पूर्णपणे सुरक्षित आहे. जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्समध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. २००० वर्षे गर्भ आईच्या पोटात कसा सुरक्षित राहिला, याबद्दल या अहवालात सांगण्यात आले आहे.

हा जगातील सर्वात जुना गर्भ आहे, असे मानले जात आहे. १८२६ मध्ये ही ममी वॉर्सा विद्यापीठाला दान करण्यात आली होती. विद्यापीठातील संशोधकांचे एक पथक २०१५ पासून या ममीचे परीक्षण करत आहे. २०२१ मध्ये या ममीचे सीटी स्कॅन करण्यात आले. सीटी स्कॅनद्वारे संशोधकांना न जन्मलेल्या मुलाच्या अवशेष ममीच्या गर्भात सापडले.

संशोधकांनी गर्भाच्या स्थितीची तपासणी केली. त्यानंतर संशोधकांनी या गूढ महिलेचा प्रसूतीच्या वेळी मृत्यू झाला नसल्याचे सांगितले आहे. या महिलेचा मृत्यू झाला, तेव्हा गर्भ २६ ते ३० आठवड्यांचा होता. जगभरातील अनेक संग्रहालयांमध्ये गर्भवती ममी ठेवण्यात आल्या असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.

ममीच्या सीटी स्कॅनमध्ये असे दिसून आले की, महिलेचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या पोटात गर्भ वाढत होता. वर्षानुवर्षे हा भ्रूण मातेच्या पोटात बोगस मृतदेहासारखा सुरक्षित पडून होता. संशोधकांनी सांगितले की, संशोधनात गर्भाला हाडे नसल्याची माहिती मिळाली आहे. गरोदर महिलेचे मम्मीकरण करताना हा प्रकार घडला असावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या :-
विद्यार्थीनीने शाळेतून घरी जाण्यास दिला नकार, शिक्षीकेने विचारपूस करताच झाला धक्कादायक खुलासा
विचित्र! ६ वर्षांच्या चिमुरडीच्या पोटात सापडला तब्बल दिड किलोचा केसांचा गुच्छ, डॉक्टरही हादरले
अजितदादा ऍक्टीव्ह नसल्याने कार्यकर्ते नाराज? अजित पवार म्हणाले, त्यांना खुश करण्यासाठी..