Share

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच केली होती हत्या, धक्कादायक कारण आले समोर

boliwood actor

काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली बांगलादेशी अभिनेत्री रायमा (Rayama)इस्लाम शिमूचा मृतदेह सापडला आहे. ढाक्यातील केरानीगंज येथील एका पुलाजवळ तिचा मृतदेह गोणीत सापडला होता. सोमवारी म्हणजेच 17 जानेवारी रोजी कदमटोली भागातील अलीपूर पुलाजवळ परिसरातील स्थानिक लोकांनी अभिनेत्रीचा मृतदेह पाहिला आणि पोलीस ठाण्यात माहिती दिली, अशी माहिती पोलिसांनी मिडीयाला दिली. (Mystery of famous actress’s murder unveiled)

मृतदेह ताब्यात आल्यानंतर आम्ही कारवाई करत अभिनेत्रीच्या पतीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायमाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. हत्येनंतर रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह रविवारी पुलाजवळ गोणीत फेकून दिला होता.

एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी सर सलीमुल्ला मेडिकल कॉलेज रुग्णालयात (एसएसएमसीएच) पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिमू रविवारी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कलाबागन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून अभिनेत्रीचा पती शाखावत अली याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पती अलीसह अभिनेत्रीच्या चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ढाका पोलिसांनी त्यांच्या अधिकृत निवेदनात अभिनेत्रीच्या हत्येमागे कौटुंबिक कलहाचे कारण सांगितले होते. त्याचवेळी, आता दिवंगत अभिनेत्रीच्या पतीने खुनाची कबुली दिली आहे. ढाक्याच्या वरिष्ठ न्यायदंडाधिकारी राबेया बेगम यांनी मंगळवारी शिमूचा पती शाखावत अलीम नोबेल आणि त्यांचा मित्र एसएमवाय अब्दुल्ला फरहाद यांना तीन दिवसांच्या चौकशीसाठी कोठडी सुनावली.

45 वर्षीय अभिनेत्रीने 1998 मध्ये ‘बार्तामन’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यांनी 25 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती बांगलादेश फिल्म आर्टिस्ट असोसिएशनची सहयोगी सदस्य होती. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही नाटकांमध्येही अभिनय केला आणि निर्मिती केली.

महत्वाच्या बातम्या-
PHOTO: मारुतीची सर्वात लोकप्रिय अल्टो येणार नवीन रुपात, ऍडव्हान्स फिचर्ससह असणार उत्तम मायलेज
आज आबा असते तर…! रोहीत पाटील यांनी शेअर केलेला ‘तो’ फोटो पाहून लोक झाली भावूक
जगात भारी नरेंद्र मोदी! जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले मोदी; अमेरीका, ब्रिटनच्या अध्यक्षांनाही टाकले मागे
मुंबईत पहिल्यांदाच गे सेक्स रॅकेट उध्वस्त, हायप्रोफाईल लोकांचा समावेश

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now