उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधम सिंह नगर (Udham Singh Nagar) जिल्ह्यात नात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या सावत्र आईशी लग्न केले. ही घटना लोकांना समजली जेव्हा महिलेच्या पतीने पोलिस स्टेशन गाठून मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या आई-मुलाचे लग्न हा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय राहिला आहे.(Uttarakhand, Udham Singh Nagar, stepmother, marriage)
हे प्रकरण जिल्ह्यातील कोतवाली बजपूरचे आहे. येथे आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये ११ वर्षांपूर्वी त्याने दुसरं लग्न केल्याचे लिहिले आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. दुसऱ्या लग्नानंतर त्याची दोन्ही मुले त्याला सोडून गेली आणि वेगळ राहू लागली.
दुसऱ्या पत्नीला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले होती. यादरम्यान पहिल्या पत्नीच्या मुलांचे घरी येणे-जाणे सुरूच होते. सगळे जण एका कुटुंबासारखे आरामात राहत होते. पत्नी माहेरी गेली होती, अनेक दिवस परत आली नाही, त्यामुळे तो तिला घ्यायला गेला, असा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. तेव्हा कळलं की ती माझ्या मुलासोबतच राहते.
मुलाने सावत्र आईसोबतच लग्न केल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. दोघे एकत्र राहतात. पत्नीला घेण्यासाठी तो मुलाकडे गेला असता त्याच्यावर मारहाण करण्यात आली. पत्नीनेही परतण्यास नकार दिला. याशिवाय पीडित व्यक्तीने पत्नीवर २० हजार रुपये घेतल्याचा आरोपही केला आहे. आरोपीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
बन्ना खेडा चौकीचे प्रभारी अर्जुन गिरी गोस्वामी यांनी सांगितले की, त्यांना एक तहरीर (पत्र) मिळाल आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या मुलावर आईला पळवून नेल्याचा आरोप केला आहे. तहरीर मिळाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘फुलपाखरु’ फेम हृता दुर्गूळेने बॉयफ्रेंड प्रतिकसोबत बांधली लग्नगाठ; पहा लग्नाचे खास फोटो
सासू सासऱ्याने लावले विधवा सुनेचे दुसरे लग्न, सर्व खर्चासहित मुलाचा बंगलाही केला तिच्या नावावर
फसवणूक केल्याप्रकरणी प्रवीण दरेकरांच्या विरोधात तक्रार दाखल; भाजप अडचणीत
दबंग PSI पल्लवी जाधव अडकली लग्नबंधनात; लग्नाचे फोटो होतायत प्रचंड व्हायरल