Share

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला वेगळे वळण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एन्ट्री, नाव वाचून व्हाल अवाक

मुंबई। झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. खूप कमी वेळात हि लाखो लोकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. तर चिमुकली परी हि सगळ्यांचे आवडते पात्र बनली आहे.

या मालिकेत यश आणि नेहाची एक वेगळीच आणि हटके लव्हस्टोरी दाखवली आहे. या दोघांच्या लव्हस्टोरी मध्ये अनेक ट्विस्ट आले आहेत. खूप अडचणींवर मात करून यशने नेहाला प्रपोज केले आणि खूप कठीण प्रसंगानंतर नेहाने देखील यशचे प्रपोजल मान्य केले. मात्र इथेच यांची लव्हस्टोरी संपली नसून, आता कुठे तरी यांच्या प्रेमाची सुरुवात झाली आहे. अजून अनेक ट्विस्ट या मालिकेत पहायला मिळणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची दमदार एंट्री होणार आहे. हिच्या येण्याने मालिका कोणत्या वळणार जाते, आणखी काय ड्रामा या मालिकेत घडणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मात्र सर्वात आधी हे जाणून घेणे गरजेचे आहे की ही अभिनेत्री आहे कोण? कोणत्या भूमिकेत हि अभिनेत्री असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हि अभिनेत्री तुमच्या सर्वांची लाडकी जिने यापूर्वीही छोट्या पडद्यावर काम केले असून, लाखो प्रेक्षकांच्या मनात अजूनही प्रसिद्ध आहे. हि नवीन एंट्री सानिका बनारसवाले जोशीची असणार आहे. सानिकाने यापूर्वी स्वाभिमान, स्वामिनी या मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर नकळत सारे घडले, स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील सानिकच्या एंट्रीने या मालिकेत आणखी काय गंमती-जमंती होणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. सानिकाच्या येण्याने यश आणि नेहामधील दुरावा कमी होणार की आणखी वाढणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

सईला मिळाला लाईफ पार्टनर? ‘या’ व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘साहेब दौलतराव सापडले’

‘या’ अभिनेत्यामुळे ऐश्वर्या-आभिषेकमध्ये पडली प्रेमाची ठिणगी, स्वत: आभिषेकने सांगितला मजेदार किस्सा

ऑस्कर, ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला लता मंगेशकरांचा पडला विसर; संतापलेली कंगना म्हणाली, अशा पुरस्कारांचा..

मुंबईच्या संघात सगळ्यात घातक फलंदाजाची एन्ट्री, सलग दोन पराभवानंतर रोहितची मोठी खेळी

 

 

 

इतर ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now