Share

तुमच्यासारखी भिकार जमात माझा केसही वाकडा करू शकत नाही; मराठी अभिनेत्याचे मोदी समर्थकांना चॅलेंज

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर ते जाहीर सभाही घेणार होते. परंतु त्या मार्गावर शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं करायला सुरुवात केली. त्यामुळे पंतप्रधान पंजाब दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले. या सर्व पार्श्वभूमीवर अभिनेता किरण माने यांनी एक मार्मिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

त्या पोस्टवरून अभिनेता किरण माने यांना मोदी समर्थकांनी खूप ट्रोल केलं. आता यावर अभिनेता किरण माने यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. “राजा पळपुटा निघाल्यावर झालेला प्रजेचा चडफडाट बघून लै हसतोय ! रहाता राहीला माझा प्रश्न.. मी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा मावळा हाय. तुमच्यासारखी भिकार जमात माझा ‘केस’बी वाकडा करू शकत नाय”, अशा शब्दांत अभिनेता किरण माने यांनी मोदी समर्थकांना उत्तर दिले आहे.

अभिनेता किरण माने यांना “मुलगी झाली हो” या स्टार प्रवाहावरील मालिकेपासून खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील त्यांची विकास पाटील ही मुलीच्या वडिलांची भूमिका फार गाजत आहे. या मालिकेतील पात्राप्रमाणेच अभिनेता किरण माने खऱ्या आयुष्यात बेधडक प्रवृत्तीचे आहेत. ते सोशल मीडियावर फार सक्रिय असतात.

देशातील किंवा राज्यातील राजकीय घडामोडींवर ते नेहमीच त्यांच्या शैलीमध्ये परखडपणे मत व्यक्त करत असतात. नुकत्याच पंतप्रधानांसोबत पंजाबमध्ये घडलेल्या घटनेवरदेखील किरण माने यांनी त्यांचं मत अतिशय मार्मिक शब्दांत मांडलं. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती.

“एक किंवा दोन प्रेक्षक नाट्यगृहात असतानाही आम्ही कधी घाबरून नाटकाचा प्रयोग रद्द केला नाही. प्रयोग हाऊसफुल्ल असल्याप्रमाणे काम करून घरी परत आलो. छातीत दम आहे भावा”, अशा शब्दांत अभिनेता किरण माने यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. अभिनेता किरण माने यांनी लिहिलेल्या या पोस्टची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा झाली होती.

या पोस्टवरून अभिनेता किरण माने यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. काही जणांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकारावर अभिनेता किरण माने यांच्याकडून प्रतिक्रिया आली नव्हती. आता त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत त्यांना दिलेल्या या धमकीला उत्तर दिले आहे. यावरून लोकांनी सोशल मीडियावर अभिनेता किरण माने यांचे कौतुक केले आहे. काही लोकांनी त्यांना पाठिंबा देखील दर्शवला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“दिल्लीत मोदींनी शेतकऱ्यांसमोर खिळे ठोकले, आज शेतकऱ्यांनी त्यांना हाकलून लावले”
घरवाली बाहरवाली! एकाच शहरात दोन पत्नींसोबत राहत होता तरूण, असा झाला भांडाफोड
बिग बॉस मराठीच्या ‘या’ स्पर्धकांना मिळाली मोठी ऑफर; आनंद शिंदेंच्या नव्या गाण्यात झळकणार?

राजकारण

Join WhatsApp

Join Now