Share

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच टाइम्स स्क्वेअरवर मुस्लिमांनी अदा केली नमाज, जगभरात खळबळ

अमेरिकेच्या (America) इतिहासात पहिल्यांदाच न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरच्या (Times Square) रस्त्यावर मुस्लिमांनी तरावीहची नमाज अदा केली. अशा प्रकारच्या दुर्मिळ घटनेत, रमजानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभाच्या निमित्ताने हजारो मुस्लिमांनी जमून शनिवारी तरावीहची नमाज अदा केली. दरम्यान, मुस्लिमांनी रस्त्यावरच नमाज अदा केल्याने सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे.(Muslims performed prayers in Times Square)

टाईम्स स्क्वेअरच्या रस्त्यावर नमाज अदा करण्यावर अनेक लोक समर्थन करत असले तरी मोठ्या संख्येने लोक याला उघडपणे विरोध करत आहेत. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे की, मुस्लिमांनी टाइम्स स्क्वेअरसारख्या लोकप्रिय ठिकाणी नमाज अदा केली. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की, अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिमांना रमजानचा सण न्यूयॉर्क शहराच्या या प्रसिद्ध ठिकाणी साजरा करून इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे हे इतरांना सांगायचे होते.

आयोजकांनी सांगितले की, इस्लामबद्दल जगभरात अनेक गैरसमज आहेत. ते पुढे म्हणाले की, आम्हाला आमच्या धर्माबद्दल माहिती नसलेल्या सर्व लोकांपर्यंत माहिती पोहचवायची होती. इस्लाम हा शांतीचा धर्म आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना शनिवारपासून सुरू झाला आहे. चंद्रदर्शनानंतर रमजानची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, टाईम्स स्क्वेअरवर नमाज अदा करण्याबाबत सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे. हे टॉप ट्रेंडिंग आहे. या घटनेवर अनेक जण जोरदार टीकाही करत आहेत. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेला UAE चा रहिवासी हसन सजवानी लिहितो, रस्त्यावर नमाज अदा केल्याने लोकांची गैरसोय होत आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये 270 पेक्षा जास्त मशिदी आहेत आणि प्रार्थना करण्यासाठी ते एक चांगले ठिकाण आहे.

धर्माचे प्रदर्शन करण्यासाठी लोकांचा मार्ग रोखण्याची गरज नाही. इस्लाम आपल्याला हे शिकवत नाही. खलिफा नावाच्या युजरने असेही लिहिले की, मी मुस्लिम आहे पण टाइम्स स्क्वेअरवर नमाज अदा करण्याचे समर्थन करत नाही. इस्लाम ‘आक्रमण’ करणार आहे किंवा घुसखोरी करणार आहे असा चुकीचा संदेश यातून दिला जाऊ शकतो. त्यामुळे नमाज फक्त मशिदीतच अदा करा.

टाइम्स स्क्वेअर हे अमेरिकेतील एक महत्त्वाचे व्यावसायिक क्षेत्र आहे. पर्यटकांमध्येही ते खूप प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे न्यूयॉर्कमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी सुमारे 5 कोटी लोक येथे भेट देण्यासाठी येतात.

महत्वाच्या बातम्या-
३८ पैशांच्या शेअरने एका वर्षात दिला १५ हजार टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, १ लाखाचे झाले १.५८ कोटी
महागाई, शिक्षण सोडून धर्मावर भर दिला जातोय; राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा
मावशीने मुलीला गुंगीचं औषध देऊन केलं बेशुद्ध; मग विवस्त्र फोटो काढत केलं ‘हे’ घृणास्पद काम
फुटपाथवर पडून होता मालकाचा मृतदेह, तासनतास पहारा देत होता कुत्रा, रशिया-युक्रेन वारमधील ह्रदयद्रावक फोटो

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now