सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाचा उत्साह सुरू आहे. अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले आहे. असे असताना आता या उत्साहात विरजण टाकणारी घटना घडली आहे. एका गरबा मैदानावर दोन मुस्लीम तरुणांना हिंदू संघटनांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
ही घटना अहमदाबाद शहरात घडली आहे. अहमदाबाद शहरातील गरबा मैदानावर मंगळवारी रात्री दोन मुस्लीम तरुणांना हिंदू संघटनांनी पकडल्याने तणाव निर्माण झाला. एवढेच नाही तर, गरब्यात आल्यामुळे हिंदू संघटनेतील काही तरुणांनी त्यांना बेदम मारहाण करून मैदानाबाहेर काढले.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या घटनेची अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही, असे समजते. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते हितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील एसपी रिंग रोडजवळ गारब्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, इथे सुरु असलेल्या गरब्यात दोन मुस्लिम तरुणांच्या प्रवेशाची माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर त्यांच्यासह बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी गरबा मैदानावर पोहोचून त्या दोघांनाही पकडले. चौकशी केल्यानंतर त्या दोघांनाही मैदानातून हाकलून देण्यात आले, असे हितेंद्र सिंह म्हणाले.
तसेच हितेंद्र सिंह पुढे म्हणाले की, येत्या काही दिवसांतही आमची सरप्राईज चौकशी सुरूच राहणार आहे, कारण काही पाखंडी लोक हिंदू मुलींची छेड काढण्यासाठी आणि चोरी करण्यासाठीही प्रवेश करतात. गरबा स्थळ देखील त्यांच्यासाठी लव्ह जिहादची अड्डा बनत आहेत.
https://twitter.com/Mr_ManmohanSing/status/1575123183820120064?t=pVhkhHeTKfzRECvuaxiaTw&s=19
या पाखंडी तरुणांना थांबवण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्यामुळेच पाखंडी लोकांविरुद्धची आमची चौकशी सुरुच राहणार आहे, असे हितेंद्र सिंह यांनी सांगत आपल्या संघटनेची येत्या काळातील भूमिका सांगितली आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेची पोलीस तक्रार झाली नाही.
या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये या दोन्ही मुस्लिम तरुणांना बेदम मारहाण केलेली दिसत आहे. मारहाणीत एका तरुणाचं शर्ट फाटलं. त्यानंतरही कार्यकर्ते काही त्याला मारहाण करायचे थांबले नाहीत. व्हिडीओमध्ये दोघेही मार खाणारे तरुण गयावया करताना दिसून आले आहेत.
अद्याप या घटनेप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसही आता ऍक्शन मोडमध्ये आलेत. पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केलीय. चौकशीत कुणी दोषी आढळलं, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आलं आहे.