Share

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्वच खरे आहे; मुस्लिम सेवा संघाचा ठाकरेंना जाहीर पाठिंबा

Uddhav Thackeray

muslim seva sangh shocking statement about uddhav thackeray  | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरी म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त आमदार खासदार असल्यामुळे आपणच खरी शिवसेना असल्याचा ते दावा करताना दिसून येत असतात.

अशात उद्धव ठाकरे यांची शिवसेना जरी राज्यात सत्तेसाठी संघर्ष करत असली तरी त्यांना विरोधकांकडून पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांकडूनही उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळताना दिसून येत आहे. अनेक नेते, संघटना उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देताना दिसून येत आहे.

आता मराठी मुस्लिम संघाच्या सदस्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्या सदस्यांनी उद्धव ठाकरे यांना आपला पुर्णपणे पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्वच खरे हिंदुत्व असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

अनेक छोट्या-मोठ्या संघटना ठाकरेंना पाठिंबा देत आहे. तसेच अनेक संघटनांचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करताना दिसून येत आहे. आता मुस्लिम सेवा संघनानेन ठाकरेंना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर अनेक वेगवेगळ्या संघटना ठाकरेंना पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे.

आज देशामध्ये जातीधर्माच्या नावावर राजकारण करुन द्वेष पसरवणारे शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. उद्धव ठाकरे यांनीच खरे हिंदुत्व जपले आहे, अशी भावना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर मोहम्मद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहीण्यात आले आहे.

देशभक्त असलेला मुस्लिम बांधव हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिशी राहिलेला आहे, असे म्हणत मुस्लिम सेवा संघाचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहे. प्रबोधन यात्रा असो वा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश ठाकरे गटाला दिवसेंदिवस मिळणारा पाठिंबा हा वाढत चालल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-
Rohit sharma : भारताने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जावं की नाही? रोहितने दोन शब्दांत संपवला विषय, म्हणाला..
shivsena : उद्धव ठाकरेंनी आखला मोठा गेमप्लॅन, एकनाथ शिंदेंच्या सर्वात जवळच्या आमदाराला देणार शह
Navneet Rana : नवनीत राणांना बोगसगिरी महागात पडणार! कोर्टाने दिले कठोर आदेश, पोलिस कुठल्याही क्षणी अटक करणार?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now