उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबाने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे 90 लाख रुपयांची वैयक्तिक मालमत्ता सुपूर्द करण्याची घोषणा केली आहे. जेणेकरून मुस्लिमांना अयोध्या आणि भगवा आवडतो, असा संदेश देशातील मुस्लिम समाजाला जाईल.
मुझफ्फरनगरच्या खालापार येथील रहिवासी डॉ. मोहम्मद समर गझनी यांनी शुक्रवारी जाहीर केले की ते अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांची सुमारे 90 लाख रुपयांची वैयक्तिक मालमत्ता देणार आहेत.
ही मालमत्ता देण्यामागे डॉ. मोहम्मद समर गझनी कारण सांगतात की, ही संपत्ती विकून त्यातील पैसा राममंदिराच्या उभारणीसाठी वापरता येईल. त्यामुळे यामधून मुस्लिमांनाही अयोध्या आणि भगवा आवडतो असा संदेश देशातील मुस्लिम आणि इतर समाजाला जाईल, असे त्यांना वाटते.
माहितीनुसार, हे तेच समर गझनी आहेत जे भगवे कपडे घालून ईदची नमाज अदा केल्यानंतर चर्चेत आले होते. ते बेहराल येथील भाजप अल्पसंख्याक समाज मोर्चाचे माजी राज्यमंत्री राहिले आहेत. त्यांनीच भाजपप्रेम आणि योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपली संपत्ती राम मंदिरासाठी दान करण्याची घोषणा केली आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोहम्मद समर म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सहकार्य करण्यासाठी त्यांना त्यांची वैयक्तिक मालमत्ता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवायची आहे, ज्यामुळे त्यातून येणारे पैसे राम मंदिराच्या निर्मितीसाठी उपयोगी येईल.
तसेच म्हणाले, यातून संपूर्ण देशातील आणि संपूर्ण राज्यातील मुस्लिमांना एक संदेश गेला पाहिजे की मुस्लिम अयोध्येवर प्रेम करतात आणि भगव्याचा द्वेष करत नाहीत आणि मुस्लिम समाजाने 2024 मध्ये योगींच्या सोबत मोठ्या संख्येने यावे. तसेच मुख्यमंत्री योगी हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत, ते फक्त गुन्हेगार आणि माफियांच्या विरोधात आहेत.
उत्तर प्रदेश के मुज़फ्फरनगर जनपद में एक मुस्लिम परिवार ने अयोध्या में राम मंदिर निर्माण के लिए अपनी 90 लाख रुपयों की निजी संपत्ति को मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ को सौपने की घोषणा की है@myogiadityanath @myogioffice pic.twitter.com/BlSZX5HEZa
— Newstrack (@newstrackmedia) May 6, 2022
ही आमची 90 लाख रुपयांची मालमत्ता आहे. जी आम्ही अयोध्येच्या नावाने दान करून मुख्यमंत्र्यांना देऊ. ईदच्या नमाजला आम्ही परिधान केलेल्या भगव्या कपड्यांमध्ये संदेश पाठवण्याचा उद्देश संपूर्ण देशाला हा संदेश देण्याचा होता की मुख्यमंत्री योगींच्या कपड्यांचा भगवा रंग कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा हिंदू मुस्लिमांच्या विरोधात नाही, हे सांगायचे आहे, असे मोहम्मद समर म्हणाले.