shivsena : शिवसेनेच्या मेळाव्याबाबत महाराष्ट्राचे राजकारण चांगले तापले आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले होते. आता मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचा नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.
या सगळ्या धामधुमीत एक वेगळीच घटना समोर येत आहे. दिवसेंदिवस शिंदे गटात अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. मात्र एवढी मोठी पक्षात फूट पडून सुद्धा या परिस्थितीत शिवसेनेवर निष्ठा ठेवणारे निष्ठावान शिवसैनिक मातोश्रीजवळ येत आहेत. उद्धव ठाकरेबाबत निष्ठा व्यक्त करत आहेत.
अशा प्रकारे नगरच्या संगमनेर येथील अजीज मोमीन हा व्यक्ती आज सकाळी मातोश्रीवर थेट पोहोचला. स्वतःच्या रक्ताने लिहिलेला बॅनर हातात घेत त्याने आपण उद्धव ठाकरेंसोबत शेवटच्या श्वासापर्यंत आहोत, अशी घोषणा मातोश्री बाहेर दिली. ‘आखरी सांस तक उद्धवसाहब के साथ रहूंगा’ असा मजकूर लिहिलेला बॅनर या मुस्लिम व्यक्तीच्या हातात त्यावेळी होता.
शिवसेनेतून हिंदुत्वाच्या नावावर बंडखोरी करणाऱ्या आमदारांना या व्यक्तीने चांगलेच सुनावले. शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करत स्वराज्याची स्थापना केली होती. या गोष्टीची आठवण या व्यक्तीने संबंधित बंडखोरांना करून दिली. आमच्या मनातील कायमचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब आहेत, असेही त्याने यावेळी बोलून दाखवले.
बंडखोरीनंतरच्या काळात अनेक निष्ठावान शिवसैनिकांच्या अशा कथा आपण मागील काळात पाहिल्या आहेत. कोणी रक्ताने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. कोणी बाळासाहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे टॅटू गोंदवून आपली निष्ठा व्यक्त केली होती. त्याचप्रकारे एका मुस्लिम बांधवांने उद्धव ठाकरेंबद्दल आपली निष्ठा रक्ताने लिहिलेला बॅनर दाखवत व्यक्त केली.
अशाप्रकारे एकीकडे उद्धव ठाकरेंचा समर्थनात निष्ठावान शिवसैनिक पुढे सरसावत आहेत. तर दुसरीकडे अनेक आमदार, खासदार शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवसेना पक्षात आणखी काय काय घडून येते? हे पहावे लागेल. मात्र सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Madhuri Dixit: भाड्याच्या घरातून आता स्वताच्या घरात शिफ्ट होणार माधुरी, तब्बल इतक्या कोटींना घेतला नवीन फ्लॅट
politics : ५० खोक्यांच्या लुटीचेच फूड पॅकेट्स, मात्र विचारांचं खरं सोनं शिवाजी पार्कवरच मिळणार
Congress : अंधेरी पोटनिवडणूकीत काॅंग्रेस शिवसेनेला पाठींबा देणार का? पटोलेंनी जाहीर केली भूमिका