Share

सिद्धू मुसेवाला प्रकरणात पोलिसांच्या हाती लागली मोठी माहिती, ‘या’ पाच गॅंगस्टर्सनी रचला होता हत्येचा कट

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस सध्या जोरदार तपास करत आहेत. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या हत्येची जबाबदारी बिष्णोई गॅंग आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सध्या पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी बराड, सचिन थापर, अनमोल बिश्नोई व विक्रम बराड या पाच गँगस्टर्सनी सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचला होता.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येबाबत आता पोलिसांच्या हाती नवीन माहिती आली आहे. पंजाब पोलिसांनी चौकशीनंतर सांगितले की, बुलेटप्रूफ वाहनातच मुसेवालाची हत्या करावी, असा लॉरेन्स टोळीचा आग्रह होता. यामुळेच मुसेवालाच्या हत्येसाठी रशियन शस्त्रे एएन ९४चा वापर करण्यात आला.

पुढे याबाबत पोलिसांनी सांगितलं की, मुसेवालाची रेकी करून गँगस्टर्स त्याच्याबाबतची संपूर्ण माहिती शार्प शूटर्सला देत होते. यामुळे आता या हत्या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे मिळतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे.

दरम्यान, जाबी गायक सिद्धू मुसेवाला(Sidhu Musewala) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबतचा खुलासा त्याच्या एका मित्राने केला आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी त्याचा मित्र गुरविंदर सिंग देखील कारमध्ये हजर होता. गुरविंदर सिंगने या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. “मी सिद्धू मुसेवाला याला बुलेटप्रूफ गाडीत बसण्यास सांगितले होते. पण त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. त्याने थार गाडीमधून जाणार असल्याचे मला सांगितले”, अशी माहिती गुरविंदर सिंग यांनी दिली आहे.

सिद्धू मुसेवाला याचा मित्र गुरविंदर सिंगने सांगितले की, “सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला झाला त्यावेळी थार गाडीमध्ये एकूण तीन लोक हजर होते. सिद्धू मुसेवाला याला बुलेटप्रूफ गाडीत बसण्यास मी सांगितले. पण त्याने मला नकार दिला आणि थार गाडीमधून जाणार असल्याचे सांगितले. हल्ल्यापूर्वी सिद्धूने गाडीमध्ये ‘उठेगा जवानी विच जनाजा मिठीये’ हे गाणे वाजवले होते.”

महत्त्वाच्या बातम्या
वा गं पोरी! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीला व्हायचंय सैन्यात भरती, वडीलांनाही झाला आनंद
बबिताजींचा बाराती डान्स झाला व्हायरल, पोट पाहून नेटकऱ्यांनी केल्या ‘अशा’ कमेंट्स
अदानींचा ड्रायव्हर म्हणणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावलं; म्हणाले, आम्ही जे काही करतो, ते…
शेतकऱ्याकडून साईचरणी ५ हजार किलो केशर आंब्याचे दान, किंमत वाचून डोळे पांढरे होतील

इतर क्राईम ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now