Murji Patel : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यासाठी भाजपकडून मुरजी पटेल यांनी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा हा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, आता भाजपचे मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच त्यांचा अर्ज मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्याकडून हा आक्षेप घेण्यात आला आहे. मुरजी पटेल यांना सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी असताना त्यांनी अर्ज कसा दाखल केला?, असा सवाल संदीप नाईक यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल यांच्या उमेवारीवरील आक्षेपाबाबद्दल माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना संदीप नाईक म्हणाले की, २०१७ पासून मुरजी पटेल यांना शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सहा वर्षे निवडणूक लढवण्यापासून बाद केले आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज कसा स्वीकारला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पुढे बोलताना मुरजी पटेल यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचेही संदीप नाईक यांनी सांगितले आहे. तसेच त्यांचा बोगस चेक देण्याबाबतचा एफआयआरही त्यांनी लपवला आहे, असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाकडून पुरावेही देण्यात आले आहेत.
मुरजी पटेल यांना बृहन्मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीत खोटे कागदपत्र सादर केल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सहा वर्षांकरिता निवडणुक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. असे असताना कोणत्या नियमानुसार त्यांचा अर्ज स्वीकारला गेला, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
२०१७ पासून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच हा विषय घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत आणि त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी आम्ही कोर्टाकडे करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी आमची मागणी आहे. तसेच एवढ्या भ्रष्ट व्यक्तीला कशी काय उमेदवारी दिली?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
eknath khadse : शिंदे – फडणवीस सरकारचा राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंना दणका! वाचा नेमकं काय घडलं?
eknath khadse : अंधेरी पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? पोलमधून झाला मोठा खुलासा, ७९ % लोकं म्हणाली..
Eknath Shinde : ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराची एकनाथ शिंदेंनी वाढवली सुरक्षा, शिंदे गटात करणार प्रवेश? चर्चांना उधाण
BJP : जानकरांचा राष्ट्रवादी आणि भाजपला धक्का; २०२४ च्या लोकसभा निवडणूकीबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा