Share

Crime News: अकोल्यात खळबळ! शिंदे गटात गेलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या, गळा आवळला अन् मृतदेह..

bhagwat deshmukh

Crime News: अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कापसी येथील तलावामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. २७ ऑगस्टला कापसी तलाव येथील कर्मचारी राजेश नारायण खंडारे हे सकाळी या तलावावर गस्तीकरिता गेले होते. तेव्हा त्यांचे लक्ष पाण्यावर तरंगत असलेल्या मृतदेहाकडे गेले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करण्याकरिता पाठविला.

वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये या मृतदेहाचा गळा दाबून खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. खून झाला आहे हे कोणाच्या लक्षात येऊ नये व मृतदेहाची ओळख पटू नये याकरिता मृतदेहाचे कपडे बदलवण्यात आले होते. त्यांनतर मृतदेह तलावात फेकून दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम ३०२, २०१ दाखल केली आहे.

भागवत देशमुख हे शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे ड्रायव्हर म्हणून होते. आता २३ ऑगस्टला अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात भागवतने प्रवेश केला. आता ते शिवसेना उपशहरप्रमुख म्हणून कार्यरत होते. अकोला येथून भागवत देशमुख (वय २९) हे २५ तारखेपासून घरून निघून गेले, अशी तक्रार पोलिसात करण्यात आली होती.

याप्रकरणी पातूर पोलिसांत पोलीस कॉन्स्टेबल गजानन गुलाबराव पाचपोर यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह दोन दिवस सलग पाण्यात असल्याने मृतदेहाची ओळख पटणे पोलिसांसाठी कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनीच अत्यंसंस्कार केले. तलावाजवळील पूर्ण परिसर शोधून काढल्यानंतर मृतदेहाच्या बाबतीत काही पुरावे हाती आले.

तपासादरम्यान कापसी तलाव येथून २ किमी अंतरावर झुडपात एक पाकीट व रुमाल मिळाला. त्यामध्ये व्यक्तीचे फोटो आणि पत्ता मिळून आल्याने मृतदेहाची ओळख पटली. मृतदेह हा अकोला शिवसेना उपशहरप्रमुख भागवत अजाबराव चव्हाण देशमुख यांचा असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.

३१ ऑगस्ट रोजी पोलिसांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना माहिती दिली की, त्यांची हत्या झाली आहे. तेव्हा मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनीच त्यांचा अंत्यविधी केला. हे ऐकून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

महत्वाच्या बातम्या
Politics: भाजप मनसेची युती होणार? मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शहा घेणार राज ठाकरेंची भेट?
Uttar Pradesh : ५०० वर्षे जुन्या मुर्ती असल्याचे सांगत दोन दिवसात जमवले ३५ हजार, पण डिलीव्हरी बॉयने केला भांडाफोड
NCP : आघाडीत बिघाडी! मिटकरींचा एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ माझ्याकडे, NCP पदाधिकाऱ्याचा दावा
Ranbir Kapoor: तब्बल १३ वर्षांनी रिलीज होतोय १८०० कोटींचा बिग बजेट चित्रपट; अक्षय, रणबीर, सैफ यांना बसणार धक्का

राजकारण इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now