Pune: पुण्यामध्ये हत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकतीच एक धक्कादायक हत्या पुण्याच्या जांभूळवाडी परिसरात घडल्याचे समोर येत आहे. बायकोला अश्लील मेसेज केले म्हणून चुलत मेहुण्याचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ४८ तासात पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला आहे.
महादेव दुपारगुडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या दिवशी जांभुळवाडी परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तो अज्ञात मृतदेह कोणाचा आहे? हे शोधण्यासाठी पोलिसांनी ३ शोध पथकं नेमली.
पोलीस पथकांकडून मृतदेहाचा फोटो व्हॉट्सअपवर प्रसारित करण्यात आला. त्यानंतर विजय दुपारगुडे नामक व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन मृत व्यक्ती आपला भाऊ असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला.
मृत व्यक्तीचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून चेक करण्यात आले. मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार तुषार मेटकरी नामक व्यक्तीला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. खून झाला त्या दिवशी तुषार आणि महादेव यांच्यामध्ये काय बोलणे झाले? तुषार त्या दिवशी कुठे होता? या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तर तुषारने देताच पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला.
त्यानंतर घाबरलेल्या तुषारने आपण महादेवचा खून केला असल्याचे कबूल केले. खून झालेला व्यक्ती व आरोपी हे एकमेकांच्या नात्यातील असल्याचे तपासात उघड झाले. तुषारच्या पत्नीला महादेव हा सातत्याने अश्लील मेसेज करून त्रास देत होता. त्याला अनेकदा सर्वांनी समजावून सांगितले. मात्र तो आपले वागणे बदलत नव्हता.
२९ ऑगस्ट रोजी तुषारने आपल्या बायकोच्या आईच्या घरी महादेवला बोलावून घेतले. सर्वांनी पुन्हा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तरी तो ऐकत नव्हता. त्यावेळी चिडलेल्या तुषारने, त्याची पत्नी व इतर साथीदारांनी महादेवला जबर मारहाण केली. बेशुद्ध पडलेल्या महादेवला त्यानंतर जांभुळवाडी येथील दगडीपूल जवळ फेकण्यात आले. तो मृतदेह नंतर पोलिसांच्या हाती लागला होता.
महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : …त्यामुळे ‘मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घ्या
वाढदिवसाच्या पार्टीत भयानक दुर्घटना; मित्रांनी केलेली गंमत जीवावर बेतली
‘हिंदू तरुणांची सेक्सुअल पॉवर कमी करण्याचा जिहाद मुस्लिम तरुणांकडून सुरू आहे’; शिक्षकाच्या दाव्याने खळबळ