Share

पुण्यात मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण ऐकून पोलीस देखील हादरले…

१० जानेवारी रोजी महेश सोसायटी चौकात असलेल्या राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह विशाल ओव्हाळ या तरुणाचा होता. त्याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची पोलिस चौकशी करत होते. अखेर आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे, आणि आरोपीने यामागील धक्कादायक कारण सांगितल्यामुळे पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

हत्या झालेल्या विशाल ओव्हाळ हा २६ वर्षांचा होता. सोमवारी पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील महेश सोसायटी चौकात असलेल्या राजीव गांधी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये त्याचा मृतदेह आढळला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले होते. त्यानंतर गुन्हेगाराला शोधण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली.

विशालच्या गुन्हेगाराला शोधणे पोलिसांना अवघड जात होते, कारण विशाल कुठलेही काम करत नव्हता आणि मोबाईलही वापरत नव्हता. त्यामुळे चौकशी करण्यात अडथळा येत होता आणि आरोपी पर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येत नव्हतं. परंतु, पोलिसांनी विशालच्या नातेवाईक व मित्रमंडळींकडून माहिती घेतली आणि घटना घडलेल्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर तसंच सीसीटीव्ही फुटेजवरून या हत्या प्रकरणातील आरोपीचा तपास लावला.

पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी गुप्त यंत्रणा कामाला लावल्या. विशालच्या हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव शिवदत्त चंद्रकांत सकट असून, त्याचे वय ३४ वर्ष एवढे आहे. तो अप्पर ओटा, बिबवेवाडी येथील रहिवासी आहे. मात्र,हत्या केल्यापासून तो परिसरात दिसत नव्हता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला.

अखेर पोलिसांच्या गुप्त यंत्रणेकडून माहिती मिळाली की, आरोपी शिवदत्त गॅस गोडाऊन परिसरात वावरत आहे. पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हत्येमागील कारण ऐकल्यावर पोलिसांना देखील धक्का बसला.

आरोपी शिवदत्त चंद्रकांत सकट याने सांगितले की, हत्येच्या दिवशी त्या दोघांनी दारू पिली होती आणि दारू पित असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. त्या वादातून, शिवदत्त याने विशाल ओव्हाळ याच्या डोक्यात दगड खालून हत्या केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या
कादर खान यांनी दिलेल्या या अटी पुर्ण करताना ढसाढसा रडले होते दिलीप कुमार, वाचा भन्नाट किस्सा
गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट कोणी आणि कुठे रचला होता? वाचा इनसाईड स्टोरी
‘या’ देशात भाऊ-बहिणीतील सेक्सवर लागणार निर्बंध, अनाचाराविरोधात आणणार नवा कायदा

क्राईम

Join WhatsApp

Join Now