बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या बहुचर्चित ‘लॉकअप’ (Lock Upp) या शोला आपल्या पहिल्या सीझनचा विजेता मिळाला आहे. जवळपास ७० दिवस चाललेल्या या शोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा शो सुरु झाल्यापासूनच फार चर्चेत होता तसेच शोला व्हुजसुद्धा खूप चांगले मिळत होते. तर आता शोला आपला पहिला-वहिला विजेता मिळाला असून विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे.
‘लॉकअप’ शोमध्ये सर्व स्पर्धकांनी एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्स दिली होती. फिनालेमध्ये टॉप ६ स्पर्धकांमध्ये प्रिंस नरूला, मुन्नवर फारूकी, पायल रोहतगी, अंजली अरोरा आणि शिवम शर्मा होते. तर यापैकी अंजली, पायल आणि मुन्नवर टॉप ३ मध्ये पोहोचले. या तिघांपैकी मुन्नवर किंवा पायलला विजेतेपद मिळणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
त्यानुसार या स्पर्धेतून अंजली आऊट झाल्याने पायल आणि मुन्नवर यापैकी कोणाला विजेतेपद मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर शेवटी या दोघांमध्ये स्टँडअप कॉमेडियन मुन्नवर फारूकीने शोचे विजेतेपद जिंकत ट्रॉफी आपल्या नावे केली. मुन्नवर शोमध्ये त्याच्या परफॉर्मन्सद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले होते. तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही मुन्नवरने अनेक धक्कादायक खुलासे केले होते.
‘लॉकअप’मध्ये मुन्नवरचा स्वभाव, त्याची वागणूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यामुळेच तो विजेतेपदापर्यंत पोहोचू शकला. तर विजेता म्हणून मुन्नवरला शोच्या ट्रॉफीसोबत २० लाख रूपये आणि कार बक्षिस म्हणून देण्यात आली. एवढेच नाही तर त्याला इटली ट्रीपला जाण्याचीही संधी मिळाली.
मुन्नवरला विजेता घोषित करताचा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. या शोच्या विजेतेपदासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुन्नवर याची आतुरतेने वाट पाहत होते. तर शेवटी त्याला यामध्ये यश मिळाले. ट्रॉफी जिंकल्यानंतर मुन्नवरने लॉकअप शोचे आणि त्याच्या चाहत्यांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या :
लॉकअपचा विजेता मुन्नवर फारुकीचे आयुष्य होते वादग्रस्त, कधी रडला तर कधी हसला
ख्रिस गेलने IPL मध्ये करणार कमबॅक, म्हणाला, मी परत येण्यास तयार आहे पण मला…
सुनील शेट्टी आहे या आलिशान गाड्यांचा मालक, चित्रपटापेक्षा बिझनेसमधूनच कमावतो बक्कळ पैसा