Share

मुमताजचा अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा, फिरोज खानशी लग्न न करण्यामागे होते ‘हे’ मोठे कारण

७० च्या दशकातील टॉप अभिनेत्री मुमताजने (Mumtaz) वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिने लहानपणापासूनच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. शम्मी कपूर (Shammi Kapoor) आणि राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासोबत मुमताजची जोडी रुपेरी पडद्यावर खूप गाजली. राजेश खन्नासोबत मुमताजचा एकही चित्रपट फ्लॉप ठरला नाही.(Mumtaz, Shammi Kapoor, Rajesh Khanna, Feroz Khan, Lagna)

त्याच वेळी, शम्मी कपूरचे देखील मुमताजवर खूप प्रेम होते आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचे होते, परंतु तेव्हा मुमताज खूपच लहान होती आणि तिला तिच्या करिअरमध्ये पुढे जायचे होते, म्हणूनच तिने शम्मी कपूरची लग्नाची ऑफर नाकारली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शम्मी कपूरशिवाय प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांनाही मुमताज आवडत होती. खुद्द मुमताजने एका मुलाखतीत याविषयी सांगितले.

 Mumtaz-Feroz Khan: Mumtaz से शादी करना चाहते थे Feroz Khan, ये कहकर कर दिया एक्ट्रेस ने रिजेक्ट

एका मुलाखतीत जेव्हा अभिनेत्री मुमताजला विचारण्यात आले की, ‘तिने फिरोज खानशी लग्न का केले नाही?’ या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली, त्यांनी मला कधीच लग्नाचा प्रस्ताव दिला नाही. त्यांची एक मैत्रीण होती जी खूप सुंदर होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. पण दोघांचे ब्रेकअप का झाले ते मला कळाल नाही.

याशिवाय मुलाखतीत मुमताज म्हणाली, ‘फिरोज खान आणि मी खूप चांगले मित्र होतो. तो माझ्यासोबत सर्व काही शेअर करायचा. कोणतीही मुलगी फिरोज आणि शम्मी यांच्या प्रेमात पडू शकते. पण फिरोज खानशी लग्न करणे म्हणजे तलावात उडी मारणे होय. माझे हृदय आधीच शम्मी कपूरमुळे तुटले होते. मला पुन्हा तेच नको होतं. यामुळेच आम्ही दोघांनी आमचं नातं फक्त मैत्रीपुरतं मर्यादित ठेवलं होतं.

फिरोज खान यांनी १९५९ मध्ये आलेल्या ‘दीदी’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला होता, पण काही वर्षे त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. १९६५ मध्ये आलेल्या ‘ऊंचे लोग’ या चित्रपटानंतर ते अधिक प्रसिद्ध झाले. त्यांनी लवकरच सफर (१९७०), अपराध (१९७२), खोटे सिक्का (१९७४), धर्मात्मा (१९७५), कुर्बानी (१९८०), जानबाज (१९८६) आणि यलगार (१९९२) यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.

फिरोज खानच्या ‘ओम शांती ओम’ नंतर अनीस बज्मीचा ‘वेलकम’ हा २००७ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटात अनिल कपूर, अक्षय कुमार, नाना पाटेकर, कतरिना कैफ, परेश रावल असे अनेक मोठे स्टार्स उपस्थित होते, मात्र अंडरवर्ल्ड डॉन आरडीएक्सची भूमिका साकारणाऱ्या फिरोज खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटात फिरोज खान हे शेवटचे दिसले होते.

महत्वाच्या बातम्या-
इतक्या वर्षांनंतर मुमताजने धर्मेंद्रला दिलं अनोखं सरप्राईज, धर्मेंद्रही झाले खुश, पत्नीने केलं जंगी स्वागत
जेव्हा मुमताज फक्त १८ वर्षांच्या होत्या तेव्हा शम्मी कपूरने केले होते त्यांना प्रपोज, समोर ठेवली होती  ही अट
खूप वर्षांनंतर धर्मेंद्रच्या घरी अचानक पोहोचली मुमताज, पहिली पत्नी प्रकाश ने केले जोरदार स्वागत
ताजमहालाचा वापर एकेकाळी मराठ्यांनी घोडे बांधायला केला होता; वाचा मराठ्यांच्या पराक्रमाचा भन्नाट किस्सा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now