लग्नाचा मंडप सजला, मुंबईहून मोठ्या थाटात नवरदेवाची वऱ्हाडी मंडळी आली, त्यानंतर पुढे जे या लग्नात घडले ते ऐकलं तर नवलच.. ही घटना औरंगाबादची आहे. लग्नात मानपानावरून कुरबुर होणे सामान्य आहे. पण लग्नातले हे वाद मारहाणीपर्यंत गेले. नवरदेवाकडची मंडळी नवरीच्या लोकांचा मानपानावरून, पाहुणचारावरुन पानउतारा करत होते. शेवटी लग्न झालं, तरी नवऱ्याने मुलीला घेऊन जाण्यास नकार देताच संतापलेल्या नातेवाईकांनी नवरदेवाला वऱ्हाडी मंडळींसहित पळवून मारले. (Mumbai’s Radekhor brides were kidnapped and killed by villagers)
जालना जिल्ह्यातील भोकरदनची नवरी मुलगी आहे. तिचा विवाह मुंबईच्या मुलासोबत ठरला होता. तिचे मामा व बहीण औरंगाबादमध्ये राहत असल्याने तिथेच लग्न लावून देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे लग्नाच्या दिवशी (गुरुवारी) वऱ्हाड औरंगाबादमध्ये पोहोचलं. नवरदेवाची मिरवणूक खुप वेळ चालली, वऱ्हाडी मंडळी दारूच्या नशेत खूप वेळ नाचतच राहिली.
लग्नाचा मुहूर्त टळून गेला तरी नवरदेवाचा मंडपात पत्ता नव्हता. नवरीच्या लोकांनी खुप विनंती केल्यानंतर १२:३० चं लग्न ३ वाजता लागलं. लग्नाला वऱ्हाडी मंडळींच्या नाचगाण्याने उशीर झाल्याने मुलीकडचे लोकं चिडले होते. त्यात ठरल्याप्रमाणे पुरोहिताला देण्याचे अर्धे पैसे नवरीच्या मेहुण्याने मुलाकडच्या मंडळींना मागितले. त्यावरून बाचाबाची झाली आणि त्यांनी नवरीच्या मेहुण्याला जबर मारहाण केली.
दोन्ही बाजूची मंडळी एकमेकांना भिडली. या भांडणात मुलीकडच्या २ महिला खूप जखमी झाल्या, त्यांची डोकी फुटली. हा वाद सोडवायला पोलीस आले. तेव्हा हे भांडण थांबले, मात्र लग्न झाल्यांवर मुलगी पसंद नाही म्हणत, नवरदेवाने तिला सोबत घेऊन जायला नकार दिला. तेव्हा वातावरण चांगलंच तापलं.
संतापलेल्या नवरीच्या नातेवाईकांनी नवरदेवाच्या लोकांना पळवून पळवून मारले, त्यांच्या गाड्या फोडल्या, सीट कव्हर फाडले. मार खाऊन शेवटी हे वऱ्हाड नवरीविनाच मुंबईला फुटक्या गाड्या घेऊन परत गेलं.
सामंजस्याने बोलणी केल्यास नवरदेवाच्या लोकांनी नवरीला सोबत नेलं असतं. मात्र नवरदेवाने पसंद नाही म्हणल्यावर नवरीनेच त्याच्यासोबत जायला नकार दिला. पुढे हे लग्न मोडलं आणि लग्नात आलेल्या नातेवाईकांत असणाऱ्या एका मुलासोबत तिचे दुसरे लग्न नातेवाईकांनी लावून दिले. हा घडलेला फॅमिली ड्रामा एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नव्हता.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! हृतिक रोशनच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
महाविकास आघाडीला ‘महा’झटका : अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही
मोठे देशभक्त आहे रतन टाटा, भारतातील शास्त्रज्ञांसाठी वाचवला ‘हा’ स्टार्टअप; प्रसिद्ध उद्योगपतीने सांगितला किस्सा