Share

‘…मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’; सुधीर मुनगंटीवारांचा नवा नारा

सध्या मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवत आहे. नुकतेच भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात कांदिवलीत पोलखोल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पोलखोल अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत विविध भागात भाजप नेत्यांकडून सभेचं आयोजन करण्यात येत आहे. त्यातच कांदिवलीत देखील सभेचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी  ‘ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’ असा नवा नारा दिला आहे.

म्हणाले, बाळासाहेबांच्या 24 कॅरेटची शिवसेना संपली आहे. आताची शिवसेना काँग्रेसच्या विचारांनी पुढे जात आहे. मुंबईत भ्रष्टाराचाराशिवाय काही सुरु आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच म्हणाले, मुंबई पालिकेचं बजेट हे कोणाच्या बापाचं नाही. हा पेग्वींनवालोंका पैसा नही है, असा कोणता विषय नाही ज्यात सरकारनं पैसै खाल्ले नाहीत असा आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच म्हणाले, गाडी सायलेंट मोडवर नाही जात तर वायब्रंट मोडवर चालते. चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, पण कधी दार उघडलं नाहीच. तसेच फाईलीचंही आहे. पैसे दिल्याशिवाय फाईल वर जातच नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आमची दोस्ती नाही, भविष्यात यांच्याशी दोस्ती होणार नसल्याचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला.

मुंबईत भ्रष्टाराचाराशिवाय काही सुरु आहे का? पेग्विंन, रस्ते काय काय चाललंय असेही ते म्हणाले. ऑलिम्पिकमध्ये अनेक स्पर्धा होतात. कोणी गोल्ड, कोणी सिल्वर पदक जिंकते. पण ऑलिम्पिकमध्ये जर भ्रष्टाचाराची स्पर्धा ठेवली तर शिवसेना गोल्ड मिडेल आणल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी सेनेला लगावला.

पुढे म्हणाले, जितना खाते है उतनी भूक बढती है, यांच्याकडे अशी कोणती बॅंक आहे जी या जन्मात पैसे टाकायचे आणि पुढच्या जन्मात खायचे असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे मुंबईकर ऊठ उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट असा नवा नारा मुनगंटीवार यांनी दिला आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now