Share

Ashish Shelar: ‘मनसे म्हणजे पहलगामचे दहशतवादी?’ ठाकरे बंधूंची दाऊद इब्राहीमशी तुलना, भाजपचा मनसेवर जहरी हल्ला

Ashish Shelar:  मुंबई येथे हिंदी आणि मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांची तुलना काश्मीरमधील (Kashmir) पहलगाम येथील दहशतवाद्यांशी (Terrorists) केली आहे.

शेलारांचं गंभीर वक्तव्य

आशिष शेलार यांनी म्हटलं की, “भाषेच्या नावावर मस्तवालपणा करणाऱ्यांना मनसेकडून चोप दिला जातोय, हे खरं आहे. मात्र अशा प्रकारे मुंबईत हिंदी भाषिकांवर हल्ला करून आपण काय साध्य करत आहोत?” शेलार यांनी मनसे कार्यकर्त्यांवर टीका करताना त्यांच्या कृतींची थेट तुलना पहलगाम (Pahalgam) येथील दहशतवाद्यांशी केली.

या वक्तव्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला असून, मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी शेलारांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

निशिकांत दुबेंचाही वादग्रस्त टोला

या प्रकरणात आणखी आग पेटवण्याचं काम केलं भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X – formerly Twitter) वर एक पोस्ट शेअर करत थेट राज ठाकरे (Raj Thackeray ), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना उद्देशून म्हटलं की, “जर तुमच्यात खरोखर हिंमत असेल, तर उर्दू भाषिकांवर हल्ला करून दाखवा. घरातला कुत्रा सुद्धा शेर असतो. शेवटी, जनता ठरवेल कोण शेर आणि कोण कुत्रा.”

काश्मीरशी तुलना आणि आरोप

निशिकांत दुबे यांनी यापूर्वीही एक पोस्ट करत काश्मीरमधील (Kashmir) स्थितीशी महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाची तुलना केली होती. त्यांनी म्हटलं की, “एकेकाळी काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आलं, आज महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला होत आहे.” त्यांच्या मते, भाषेच्या आधारावर मराठी नेते हिंदी भाषिकांना लक्ष्य करत असून, यामागे एक प्रकारची विघटनवादी मानसिकता आहे.

राजकीय वातावरण चिघळले

भाषावादाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेल्या तणावात आता वैयक्तिक आणि धारदार टीकाही पाहायला मिळते आहे. एकीकडे मनसे (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मराठी अस्मितेसाठी एकत्र येण्याचे प्रयत्न करत असताना, दुसरीकडे भाजप (BJP) नेते याला प्रखर विरोध करत असून, मर्यादा ओलांडणारी वक्तव्यंही करत आहेत.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now