mumbai shraddha friend revealed shraddha message | दिल्लीतील मेहरौली भागातील श्रद्धा हत्याकांडाचा खुलासा झाल्यानंतर आरोपी आफताबबाबत नवे खुलासे होत आहेत. श्रद्धाचा कॉलेज मित्र रजत शुक्लाने आफताब आणि श्रद्धाबद्दल एक नवीन गोष्ट सांगितली आहे. रजत शुक्ला यांनी सांगितले की, श्रद्धा आणि आफताब २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते.
तसेच पुढे तो म्हणाला की, सुरुवातीला दोघेही आनंदाने राहत होते, नंतर आफताब तिला मारहाण करायचा असे श्रद्धाने सांगायला सुरुवात केली. तिला त्याला सोडायचे होते, पण तसे करता आले नाही. त्याचवेळी श्रद्धाचा बालपणीचा मित्र लक्ष्मण नाडर यालाही तिने मदत मागितली होती.
वसईत राहणारी श्रद्धा वालकर हिचा तिच्या प्रियकराने जीव घेतला आहे. त्याने हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. ते तीन आठवडे त्याने फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर तो एक-एक फेकत होता. त्यानंतर पोलिसांना काही तुकडे सापडल्यानंतर याचा तपास करत असताना पोलिस गुन्हेगारापर्यंत पोहचले आहे.
श्रद्धाला तिच्या जीवाला धोका असल्याचे आधीच लक्षात आले होते, असा दावा आता तिच्या मित्राने केला आहे. श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नादरने श्रद्धा अडचणीत असल्याचे कळवले होते. सप्टेंबरपासून श्रद्धा कुठं आहे हे कोणालाच माहिती नव्हते. लक्ष्मणने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. त्यामध्ये त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.
तो म्हणाला की, एकदा तिने व्हॉट्सऍपवर मला एक मेसेज केला होता आणि माझी याच्या घरातून सुटका कर अशी मला ती म्हणाली होती. त्यावेळी ती म्हणाली होती की, मी याच्याबरोबर आज रात्री थांबली तर तो मला मारुन टाकेल. या मॅसेजनंतर लक्ष्मण त्याच्या काही मित्रांबरोबर श्रद्धाच्या छत्रापूरच्या घरी गेला आणि त्याने अफताबला पोलिसांमध्ये जाईल असा इशारा दिला.
त्यावेळी अफताबने पोलिसांकडे जाऊ नका, मी असे काही करणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे आम्ही ते प्रकरण पोलिसांपर्यंत नेलं नाही. पण गेल्या दोन महिन्यांपासून श्रद्धा संपर्कात नाहीये. त्यामुळे आम्हा सर्वांना तिची चिंता वाटत होती, असे लक्ष्मणने सांगितले आहे.
तिने गेल्या दोन महिन्यापासून माझ्या संपर्कात नव्हती. तिने माझ्या मेसेजला रिप्लाय देणं थांबवलं होतं. त्यामुळे मला खुप चिंता वाटत होती. त्यानंतर मी चौकशी करायला सुरुवात केली. पण मला कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे मी तिच्या भावाला कल्पना दिली, असे लक्ष्मणने सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन गाठले होते.
दरम्यान, अफताब आणि श्रद्धा हे २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. श्रद्धाने आपल्या प्रेमाबाबत घरी सांगितले होते. पण त्यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे अफताब आणि श्रद्धा हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघेही एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते.
महत्वाच्या बातम्या-
Swapnil Joshi : तेव्हा त्याच्यात अन् माझ्यात फक्त एका श्वासाचं अंतर..; शिल्पा तुळसकरने सांगीतला स्वप्नील जोशीसोबतचा रोमॅंटीक किस्सा
Mahesh babu : सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुखा:चा डोंगर; आई पाठोपाठ वडीलांचेही निधन
हे तर गटार दर्जाचं राजकारण! आव्हाडांवरील घाणेरड्या आरोपांमुळे समाजसेविका शिंदे सरकारवर संतापल्या