पुणे-मुंबई महामार्गावरील (Pune-Mumbai highway)अपघाताचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कराचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. (mumbai pune expressway accident 4 killed 8 injured)
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे मुंबईच्या दिशेनं येणारी 6 वाहनं बोरघाटात एकमेकांना धडकली. या अपघाताचा तडाखा इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला. यात कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या वाहनांचा बोरघाटात भीषण अपघात झाला. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा पूर्णपणे चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मागील पंधरा दिवसांपूर्वी मावळ येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नारायणगाव जुन्नर रोडवर झालेल्या अपघातातही दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्त तसेच पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
तसेच ३० जानेवारीला मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. हा अपघात इतका भीषण होता की यामध्येएका कारचा चुराडा झाला. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा शिलाटणे गावाजवळ ही घटना घडली होती.
महत्त्वाच्या बातम्या
‘नुकसान झालं तरी चालेल’, म्हणत साध्या देशी सायकलमध्ये पैसै गुंतवण्यास आनंद महिंद्रा तयार
‘राऊत साहेब तुरुंगात अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे’, किरीट सोमय्यांचा पलटवार
मोठी बातमी! आता वाहन चालवताना फोनवर बोलणे गुन्हा नाही, पण करावे लागेल ‘या’ नियमांचे पालन
युवराज संभाजीराजे छत्रपतींचा मोठा निर्णय! २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार