Share

बड्या हस्तींवर धाडी टाकणाऱ्या ईडीचीच आता चौकशी होणार; मुंबई पोलीसांनी उचलले ‘हे’ मोठे पाऊल

mumbai polic

वेगवेगळ्या कारणांनी सध्या राजकीय वातावरण चांगलच तापल आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर होतं असलेली ईडीच्या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी म्हणजेच 8 मार्च रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती.

त्यावेळी त्यांनी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीवर वसुलीचे आरोप लावले होते. ‘ईडीचे मुंबई व दिल्लीतील काही अधिकारी आपल्या वसुली एजंट मार्फत कोट्यवधींची वसुली करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. लवकरच ईडीचे काही अधिकारी तुरूंगात असतील, असा हल्लाबोल राऊत यांनी केला होता. या प्रकरणात राऊत यांनी जितू नवलानी नावाच्या व्यापाऱ्यावरही आरोप केले होते.

तसेच शिवसेना नेते अरविंद भोसले यांनी या प्रकरणात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. भोसले यांनी तक्रारीत 70 कंपन्यांची एक यादी दिली होती. “या कंपन्यांकडून पैशांची वसुली करुन ते सात विविध कंपन्यांमध्ये ट्रान्सफर केले होते. या कंपन्यांनी लिंक जितू नवलानीशी जोडलेली आहे,” असं तक्रारीत म्हटलं होतं.

भोसले यांनी तक्रारीत म्हंटलं होतं की, “आतापर्यंत सुमारे 59 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. सोबतच कोट्यवधी रुपये जितू नवलानीला दिले आहेत.” यापैकी काही पैसे ईडीच्या काही अधिकाऱ्यांनाही दिले आहेत, जे वसुलीच्या टीममधील सदस्य आहे.’ या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

विशेष बाब म्हणजे आतापर्यंत तीन जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक अपराध शाखेने (EOW) सुरु केला आहे. याबाबत EOW च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांचा जबाब नोंदवला असल्याची माहिती मिळाली आहे.

आणखी काही लोकांचा जबाब नोंदवून त्यांच्या कंपन्यांना पैसा कुठून मिळाला याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले आहे. याचबरोबर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, “सध्या EOW ने जितू नवलानी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस पाठवलेली नसल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात EOW काही गोष्टींचा अभ्यास करत असल्याची माहिती हाती आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
धोनीच्या CSK मध्ये अचानक झाली ‘या’ धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री, बाकीच्या संघांमध्ये पसरली दहशत
‘द काश्मीर फाईल्स’नंतर येणार ‘द केरळ स्टोरी’, फिल्ममधून उलगडणार ‘त्या’ ३२ बेपत्ता मुलींचे रहस्य
महाराष्ट्र हादरला! भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग, ११ कामगारांचा होरपळून मृत्यु
आता दिलीप वळसे पाटलांची विकेट पडणार? जयश्री पाटलांनी सदावर्तेंच्या कानात काय सांगितलं? चर्चांना उधाण

क्राईम इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now