राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या चप्पलफेक आणि दगडफेकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ११० आंदोलकांसह एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. (mumbai police revealed gunratna sadavarte)
कट रचणे, जमावाला भडकवणे, चिथावणीखोर भाषणे करणे, या गुन्ह्या अंतर्गत सदावर्तेंवा अटक करण्यात आली आहे. या घटनेवर वेगवेगळे लोक प्रतिक्रिया देत आहे. असे असतानाच आता मुंबईचे माजी पोलिस अधिकारी ऍड विश्वास कश्यप यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वास कश्यप यांची फेसबुक पोस्ट-
गुणरत्न सदावर्ते डुप्लिकेट बुद्धिस्ट……
गुणरत्न सदावर्ते हा डुप्लिकेट बुद्धिस्ट आहे . कारण सुशिक्षित बौद्ध लोकांचे वर्तन अतिशय सज्जन , विवेकी , नम्र , सौजन्याने युक्तिवाद करणारे असेच असते . यातला एकही गुण या माणसात आढळून येत नाही . अतिशय कर्कश आवाजात बोलून फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय हीन दर्जाच्या भाषेत बोलणे म्हणजे वकिली करणे किंवा नेतागिरी करणे असे त्याचे मत बनले आहे .
गुणरत्न हा संघाने सोडलेला , हिंसक भाषा बोलणारा व्यक्ती आहे .तो डुप्लिकेट बुद्धिस्ट आहे . संघाने जी अशी माणसे समाजात सोडली आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देणे ही गोदी मीडियाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी अतिशय पद्धतशीरपणे गोदी मीडिया पार पाडत असल्याने अशांचे फावते आहे.
मागे तो तथाकथित मुल्ला समीर वानखेडे यांनाही असेच वापरून घेतले . समीर मियाँच्या अंगावर शेकल्यावर मी महार आहे , संविधान मानणारा आहे , मी ॲट्रॉसिटी कायदा वापरू शकतो वगैरे वगैरे बोलत बचाव करू लागले . जेव्हा यांना गलेलठ्ठ पगार आणि वरची मलई मिळत असते त्यातील थोडा सुद्धा भाग ते आंबेडकर जयंतीला देणार नाहीत . पण लफडयात अडकल्यावर लगेच जात पुढे करणार अशी यांची घाणेरडी वृत्ती .
आता या सदावर्तेचेच पहा . तोंडी गावगुंडांची भाषा . विकृत हातवारे करून गलिच्छ बोलणे ही याची खासियत . महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उद्धव असा शब्दप्रयोग वापरून अरे-तुरेच भाषा वापरतो . शरद पवारांसारख्या देशातील ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख राष्ट्रवादीचा वयोवृद्ध पुढारी शरद पवार असा एकेरी करणे , इतका माजूरडेपणा आणि वेडेपणा हा कोणाच्या जीवावर करतो ? त्याच्या मागे कोणती संघशक्ती आहे ?भाजपाची मूक संमती आहे का ? भाजपा याच्या तोंडून काही बोलून घेत आहे का ? अशा मूर्खाला पुढे करून कोण काय साध्य करून घेत आहे ?
मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट दाखल करणाऱ्या माणसाला सध्या एक मराठा लाख मराठा म्हणायला लाज कशी वाटत नाही ? लोकांना मूर्ख समजतो की काय हा ? स्वतःला बौद्ध म्हणवून घेणारा हा अतिशहाणा जय श्रीराम च्या नावाने मोठा जयघोष करतो . त्यावेळी त्याला बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञेचा विसर पडतो की काय ? हे साले डुप्लिकेट बुद्धिस्ट सवलती घ्यायला पुढे असणार.
सदावर्तेने त्याला जामीन मिळाल्यावर समाजमाध्यमावर जाऊन त्याच्या विरोधातील गेल्या दोन दिवसातील कमेंट्स वाचाव्यात म्हणजे त्याला त्याची लायकी कळेल . झोडून काढा , नागडा करा यापेक्षा भयानक शेकडो कमेंट्स यात आहेत .
या सदावर्तेच्या नादी लागून ज्यांनी शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले त्यातील १०९ जणांना पोलिसांनी अटक केले . त्यांना आज न्यायालयीन कोठडी मिळाली.
न्यायालयीन कोठडी म्हणजे जेलमध्ये राहणे . या सर्वांच्या जामीनाची व्यवस्था होई पर्यंत कमीत कमी एक आठवडा जाईल . तोपर्यंत त्या सर्वांना तुरुंगातच रहावे लागेल . या जीवघेण्या कडक उन्हात तुरुंगात राहणे म्हणजे काय नरकयातना असतात हे त्यांना कळेल. असो.
बौद्ध धर्मीयांच्या वकिली पेशाचा मोठा ज्वलंत इतिहास आहे . कारण आमच्या सर्वांचा बाप डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे देशातील एक विद्वान वकील होते . बॅरिस्टर होते . प्रकांडपंडित होते . अशा वकिल बापाची आम्ही अवलाद आहोत . सदावर्तेसारख्या चिनपाट वकीलामुळे सार्या बौद्धांना खाली मान घालावी लागते . ही भारत भूमी बुद्धांची भूमी आहे . या डुप्लिकेट बौद्धांमुळे बुद्ध धम्मावर अनेक लोक शंका घेतात.
सदावर्तेसारख्या वकिलाची सनद रद्द व्हावी अशी विनंती आम्ही बार कौंसिलला कदापि करणार नाही .तर त्याला सक्तीने इगतपुरी येथे विपश्यनेला पाठवावे असे आम्ही सुचविणार आहोत. सदावर्तेने मीडियासमोर सतत बाबासाहेबांचे नाव घेऊन बौद्ध समाजाची बदनामी करू नये . त्याने वैयक्तिक काय गोंधळ घालायचा तो घालावा . मात्र समाजाचा तसेच बाबासाहेबांच्या नावाचा स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापर करू नये अशी समस्त फुले शाहू आंबेडकरी अनुयायांचे आवाहन आहे.
महत्वाच्या बातम्या-
सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये लाटले; कर्मचाऱ्यानेच समोर आणले सत्य
कश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी तरूणांनो तलवारी बाळगा; साध्वीचे आवाहन
“मातोश्रीत बसलेल्यांनी सभेला लाखांची गर्दी जमवून दाखवावी” मनसेचं आदित्य ठाकरेंना जाहीर चॅलेंज