Share

९ वर्षापुर्वी अपहरण झालेल्या मुलीला मुंबई पोलिसांनी अखेर शोधलंच; आता आहे ‘या’ अवस्थेत

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. २०१३ साली ही मुलगी अंधेरी पश्चिमेच्या परिसरातून गायब झाली होती. त्यावेळी ती मुलगी सात वर्षांची होती.

२०१३ साली ती शाळेतून घरी न आल्यामुळे आईवडिलांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, ती सापडली नाही त्यामुळे त्यांनी पोलिसात देखील तक्रार केली. पोलीस तेव्हापासून तिचा शोध घेत होते. मुंबईच्या अंधेरी परिसरात ही घटना घडली.

मधल्या काळात या मुलीच्या बाबांचाही मृत्यू झाला. मुलीची आई शेंगदाणे विकून गुजराण करत असते. पोटची लेक गमावल्याचं दुःख आईच्या मनात सलत होतं. आपली मुलगी आज नाहीतर उद्या सापडेल ही आशा ठेऊन तिची आई दिवस काढत होती.

हरवलेल्या मुलीचं नाव पूजा गौड आहे. तिचं वय आता १६ वर्ष असून ती सात वर्षांची असताना हरवली होती.  २२ जानेवारी २०१३ रोजी ती हरवली असल्याची तक्रार डीएन नगर पोलीस स्थानकात देण्यात आली. ही १६६ वी बेपत्ता मुलीची तक्रार डीएन नगर पोलीस स्थानकात देण्यात आलेली.

मे २०१५ पर्यंत बेपत्ता मुलीच्या तक्रारींमध्ये पूजा गौड ही एकमेव बेपत्ता मुलगी होती, जिचा ठावठिकाणा लागू शकला नव्हता. राजेंद्र भोसले हे तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असताना यांनीही पूजाचा शोध घेण्यासाठी कसून तपास केला होता. पण निवृत्त होईपर्यंत त्यांना काही पूजाचा शोध लागू शकला नव्हता.

चार दिवसांपूर्वीच भोसले यांनी माहीम दर्ग्यात पूजा सापडावी, यासाठी देवाला प्रार्थना केली होती. तसंच पूजाच्या आईची भेट घेतली होती. त्यानंतर ते गावी खेडला निघून गेले होते. दरम्यान, डीएन नगर पोलिसांनी आपला तपास सुरुच ठेवला होता. स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने पुजाबाबत काही माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी जुहूच्या गजबजलेल्या चाळींमध्ये अखेर तपास केला आणि पुजाचा ठावठिकाणा शोधून काढला. डीएन नगर पोलिसांनी नऊ वर्षांआधी हरवलेल्या सात वर्षांच्या चिमुरडीला पोलिसांनी अखेर शोधून काढलं. तिचं अपहरण केल्याप्रकरणरी इलेक्ट्रीशियनचं काम करणाऱ्या हॅरी डिसोझा आणि त्याच्या बायकोला अटक केली.

यानंतर पूजाला तिच्या आई आणि भावंडांच्या हवाले केलं. मूल होत नाही म्हणून हॅरी आणि त्याच्या पत्नीने सात वर्षांच्या पूजाचं अपहरण केलं होतं. पण नंतर अपत्य झाल्यानंतर हॅरी आणि त्याच्या बायकोनं पूजाला मोलकरणीसारखं राबवलं होतं. अखेर आता या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत

क्राईम

Join WhatsApp

Join Now