गेल्या पाच महिन्यापासून विलगीकरणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवास स्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर चप्पलफेक करत आपला आक्रोश व्यक्त केला. तसेच 120 कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवारच जबाबदार असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी यावेळी लावला.
कर्मचाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. मध्यरात्री मुंबई पोलिसांनी आझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. यामधील 5 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात घोषणाबाजी सुरू केली आहे. एसटी कर्मचारी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्यानंतर मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आझाद मैदान सोडण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. तसेच वकील गुणरत्न सदावर्ते सांगतील तो पर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली. त्यामुळे मध्यरात्रीच पोलिसांनी कर्मचाऱ्यावर कारवाई केली.
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातून २५० कर्मचाऱ्यांना बाहेर काढत पाच जणांना ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर, शुक्रवारी गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केले आहे. शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांची भाषणं तपासली पाहिजेत, अशी मागणी केली होती.
याकारणाने मुंबई पोलिसांनी सदावर्तेंना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र थोड्या वेळातच त्यांच्या अटकेची बातमी समोर आली. यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत, “एकशे चोवीस महिलांचे कुंकू पुसले गेले. हल्लेखोर असते, तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे गुलामगिरीतून बाहेर येण्याचे लक्षण आहे,” असे सदावर्तेंनी म्हटले होते.
याचबरोबर, “जी घटना घडली त्याची माहिती मला न्यायालयात असताना मिळाली. शरद पवारांच्या निवासस्थानी कोणी गेलं, आंदोलन कोणी केलं याची माहिती नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि इतरांची लाय डिटेक्टर चाचणी करा.” अशी मागणी त्यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
सोशल मीडियावर भावना व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्षात काहीतरी करा; जुही चावल्याच्या ‘त्या’ ट्विटवर लोकांनी फटकारले
सोनम कपूरच्या घरावर दरोडा, कोट्यावधींचा ऐवज लंपास; आकडा वाचून डोळे फिरतील
मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! वर्षापुर्वीच्या ‘त्या’ प्रकरणात सदावर्तेच्या पत्नीला अटक करण्याची मागणी
मोठी बातमी! हॉलिवूड अभिनेता विल स्मिथवर दहा वर्षांची बंदी, ऑस्करने घेतला निर्णय






