आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपत पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला धक्क्यावर धक्के भेटत आहे. आज मुंबई विरुद्ध राजस्थान असा सामना होता. पण हा सामना राजस्थान रॉयल्सने २३ धावांनी जिंकला आहे. तर मुंबईला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. (mumbai lost match against rajsthan)
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला निघालेल्या राजस्थान संघाला पहिला झटका फार लवकर बसला. यादरम्यान त्यांचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल फक्त एकच धावा करून बाद झाला.
राजस्थानच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, जोस बटलरने सर्वाधिक धावा काढल्या. यादरम्यान त्याने राजस्थानसाठी ६८ चेंडूत १०० धावा केल्या. ज्यामध्ये ११ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्यामुळे राजस्थानला १९३ धावांपर्यंत मजल मारता आली.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना खूपच थ्रिलर होता. पण शेवटी राजस्थानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत सामना २३ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात जॉस बटलरने जबरदस्त फलंदाजी करत राजस्थानला विशाल स्कोर उभा करुन दिला त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणे शक्य झाले.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली नव्हती. पण जोस बटलरने धडाकेबाद फलंदाजी केली. संघाच्या वतीने फलंदाजीला आलेल्या जोस बटलरने शानदार फलंदाजी करताना ६८ चेंडूत १०० धावा केल्या.
तसेच राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने २१ चेंडूत ३० धावा केल्या. यादरम्यान राजस्थानने मुंबईसमोर १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला.
रोहित शर्मा ५ चेंडूत १० धावा करून बाद झाला. पण त्यानंतर इशान किशनने ४३ चेंडूत ५४ धावा केले, तर टीळक वर्माने ३३ चेंडूत ६१ धावा केल्या. त्यामुळे मुंबई हा सामना जिंकणार असे वाटत होते. पण राजस्थानच्या गोलंदाजांनी पूर्ण सामन्याचे चित्रच बदलले. राजस्थानच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर सैनी आणि चहलने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या तर बोल्ट, क्रिष्णा आणि अश्विनने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या-
राजकुमार रावची झाली फसवणूक, स्वतःच पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला, कोणीतरी माझ्या नावावर..
अभिनेता राजकुमार रावच्या नावावर भलत्यानेच घेतलं कर्ज, पॅनकार्डचा वापर करत घातला गंडा, अभिनेताही झाला हैराण
‘दिलेली शिक्षा भोगायला तयार’ ऑस्करमधील वादानंतर विल स्मिथचं मोठं पाऊल, ‘या’ संस्थेतून झाला पायउतार