Share

mumbai indians : मुंबई इंडियन्सचा धक्कादायक निर्णय, स्टार खेळाडूची संघातून हकालपट्टी; ‘या’ ७ खेळाडूंना ठेवलं कायम

mumbai

mumbai indians remove arjun tendulkar  | इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) पुढचा सिजन सुरू होण्यापूर्वीच आयपीएलचे संघ ऍक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावापूर्वी खेळाडूंची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ साठी पहिला ट्रेड केला आहे.

अशात मुंबईच्या संघाने आपल्या संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सात खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अशात एक हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. या यादीत सात खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला असला तरी यामध्ये सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकरला संधी देण्यात आलेली नाही.

अर्जून तेंडूलकर हा एक युवा वेगवान गोलंदाज आहे. त्याला अजून आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तो गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या संघाचा भाग होता. अशात कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव नसल्यामुळे त्याचा संघातून पत्ताकट झाल्याची चर्चा आहे.

मेगा लिलावामध्ये अर्जून तेंडूलकरला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्यानंतर तो संघात दाखल झाला होता. पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर आता तर त्याला मुंबई इंडियन्सने कायम असलेल्या खेळाडूंमध्येही स्थान दिलेले नाही.

तसेच अर्जून तेंडूलकरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून स्थान मिळत नव्हते. त्यामुळे त्याने गोव्याकडून खेळण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या संघात अनेक स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे त्याला संधी मिळत नव्हती. त्यानंतर तो गोव्याकडून खेळताना दिसत आहे. अशात मुंबई इंडियन्सच्या संघाने सुद्धा अर्जून तेंडूलकरचा संघातून पत्ताकट केला आहे.

दरम्यान, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, टीम डेव्हिड आणि इशान किशन हे खेळाडू संघात कायम असणार आहे. तर किरॉन पोलार्ड, फॅब एलन आणि टायमल मिल्स, अनमोलप्रीत सिंग, मोहम्मद अर्शद खान, मयंक मार्कंडेय, संजय यादव, रमणदीप सिंग, अर्जून तेंडूलकर, आर्यन जुयाल, आकाश मधवाल, राहूल बुद्धी आणि मुरुगन अश्विन यांची संघातून हकालपट्टी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
Suryakumar Yadav : सुर्याला खूप लवकर संधी द्यायला पाहीजे होती, पण त्यांनी दुर्लक्ष केले; पांड्याचा विराटवर थेट निशाना
kalyani jadhav : बिग ब्रेकींग! ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील अभिनेत्री भीषण अपघातात जागीच ठार; सिनेसृष्टीवर शोककळा
pratapgad : आता महाराजांच्या गडावरही अतिक्रमन; प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाशिवाय आणखी दोन कबरी आढळल्या

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now