मुंबई इंडियन्सने ‘या’ कारणामुळे हार्दिकला केलं नाही रिटेन; वाचून बसेल धक्का….

आयपीएल 2022 ची तयारी जोरात सुरू आहे. मेगा लिलावासाठी सर्व संघ रणनीती बनवत आहेत. 12-13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये मेगा लिलाव आहेत. यापूर्वी लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन आयपीएल संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुल असून, मार्क स्टोनिस आणि रवी बिश्नोई देखील याच संघात आहेत. तर,अहमदाबादच्या आयपीएल संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आहे. अशातच मुंबईनं हार्दिक पांड्याला रिटेन का केले नाही, या कारणावर चर्चा होताना दिसत आहे.

लिलाव होण्याआधी आयपीएलच्या 8 टीमनी त्यांचे महत्वाचे खेळाडू रिटेन केले, तर लखनऊ आणि अहमदाबादच्या टीमला लिलावाआधी प्रत्येकी 3-3 खेळाडू रिटेन करण्याची मुभा होती. यानंतर लखनऊने केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस आणि रवी बिष्णोईला रिटेन केलं. तर अहमदाबादने हार्दिक पांड्या,शुभमन गिल आणि राशीद खान यांना टीममध्ये घेतलं.

हार्दिक पांड्याने आयपीएलमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली होती आणि तो संघाचा महत्त्वाचा भाग होता. हार्दिक बरोबर कृणाल सुद्धा मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र दोघांनाही मुंबईने रिटेन केलं नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, हार्दिकला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं नसल्याचं कारण समोर आलं होतं की, हार्दिकची फिटनेस व्यवस्थित नाही. म्हणून त्याला रिटेन केलं नाही. मात्र, आता याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. हार्दिकला नेमकं कोणत्या कारणामुळे मुंबईनं रिटेन केलं नाही, याचं खरं कारण समोर आलं आहे.

हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार व्हायचं होतं. याबाबत हार्दिकने टीम मॅनेजमेंटला सांगितलं होतं. पण, सहमती न झाल्यामुळे मुंबई इंडियन्सने हार्दिकला काढून टाकलं. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे,आणि त्याने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली असताना, हार्दिक ने कर्णधार पदाची मागणी कशी काय केली याचं आश्चर्य सर्वांना वाटत होतं.

हार्दिकला मुंबई इंडियन्समध्ये कायम न ठेवल्यानंतर आता अहमदाबादच्या संघाने त्याला करारबद्ध केले आहे. अहमदाबादच्या संघाने हार्दिकला 15 कोटींमध्ये करारबद्ध केले असून कर्णधारही केले आहे. याशिवाय राशीद खाननेही 15 कोटी रूपये तर शुभमन गिलने टीमकडून 8 कोटी रुपये घेतले आहेत.