शनिवारी शिवाजी पार्कवर गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मनसेच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांनी केलेले भाषण तुफान गाजले. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांनाही कडाडून विरोध केला होता. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापले आहे.
तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत, तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा गर्भित इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. तुमच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होतो. धर्म निर्माण झाला तेव्हा भोंगे होते का? तुम्ही तुमची प्रार्थना जरुर करा. पण त्याचं सार्वजनिक प्रदर्शन नको, असं राज ठाकरे यांनी म्हंटले होते.
राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. काल मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हनुमान चालिसा सुरू करण्यात आली होती.
आज नाशिकमध्ये देखील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशकातील भद्रकाली परिसरातही मनसेने भोंगे लावले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नाशिक शहरात इतरत्रही भोंगे लावण्याचे पदाधिकाऱ्यांचे नियोजन आहे. तर दुसरीकडे मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान सुरु झाला आहे.
अशातच मनसेने हनुमान चालिसा सुरु केल्याने राज्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील रोखठोक भूमिका घेतली आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही, तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानावर टीका केली आहे. समाचार घेताना सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पत्नीला नांदायला पाठवत नव्हती सासू; मध्यरात्री तरुणाने सासरवाडीत येऊन सासूसोबत केलं भयंकर कृत्य
‘ऊसतोड मजुरांच्या मुलांना कोयत्याऐवजी वही, पेन अन् पुस्तक देऊ’ मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना दिला शब्द
राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाला पाठिंबा, पण त्याआधी अमित ठाकरेंना…; आंबेडकरांनी ठाकरेंना दिलं खुलं आव्हान
फक्त एका दिवसात मायलेकी कमवत होत्या १० हजार रुपये; कारण समोर आल्यानंतर पोलिसही चक्रावले