Share

Sandeep Deshpande : “मेहता बिहतांनी चड्डीत राहावं, मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच वाजवू”; देशपांडेंचा भाजप आमदाराला इशारा

Sandeep Deshpande : मुंबईत (Mumbai) सध्या मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा चिघळलेला असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजप (BJP) आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यावर खरमरीत शब्दांत निशाणा साधला आहे.

संदीप देशपांडे यांनी ‘एक्स’ (Ex – Twitter) वर पोस्ट करत म्हटलं, “बेपारी आहात, बेपार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल. बाकी मेहता-बहता नी चड्डीत राहायचं. तूर्तास एवढंच.”

मिरा-भाईंदरमध्ये मिठाई विक्रेत्याला मारहाण

संपूर्ण वादाची सुरुवात मिरा-भाईंदर परिसरातील एका मिठाई विक्रेत्याने ग्राहकांशी मराठीत न बोलण्याच्या मुद्द्यावरून झाली. मराठी भाषेचा अपमान केल्याच्या कारणावरून मनसेच्या (MNS) काही पदाधिकाऱ्यांनी त्या दुकानदाराला रविवारी मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रकरणाने राजकीय व सामाजिक वळण घेतलं.

या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी गुरुवारी बंद पाळला आणि मोर्चा काढला. काशीमीरा पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

अविनाश जाधव यांचे भाजपवर गंभीर आरोप

या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “बुधवारी रात्री व्यापारी संघटना आणि पोलिसांशी चर्चा होऊन मोर्चा न काढण्याचे ठरले होते. मात्र, भाजपच्या स्थानिक एजंटांनी गुरुवारी पुन्हा मोर्चा काढायला लावला.”

त्यांनी पुढे असा इशाराही दिला की, “भाजपने मराठी मतदारांना लक्ष्य करत असे प्रकार थांबवावेत. अन्यथा आम्ही नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्या घरावर मराठी बांधवांसह मोर्चा काढू.”

मनसे भाजपमध्ये वाढती दरी

या सर्व घडामोडी ठाकरे बंधूंमधील (Thackeray brothers) वाढत्या जवळिकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेने (MNS) आणि भाजप (BJP) यांच्यातील राजकीय तणाव अधिक वाढत चालल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर ही धग आणखी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now