काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे आक्षेपार्ह विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘‘मी एवढय़ा वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही.’’ त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तर दुसरीकडे देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे म्हणत भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपाकडून राज्यभरात आंदोलने करण्यात येत असून नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच आज मुंबई प्रदेश भाजपाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, पटोले यांच्यावर कारवाई करण्याची सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य सरकारला करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान दिला.
तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पटोलेंच्या या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसात जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
”मविआ सरकारचे मंत्री आणि त्यांचे नेते नेहमीप्रमाणे या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहेत. मात्र सरकारला त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, अन्यथा परिणाम तुमच्यासमोर असतील. मी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी पोलीसांत जाऊन पटोलेंच्या विरोधात तक्रार दाखल करावी असे आवाहन पाटील यांनी केले आहे.”
चंद्रकांत पाटलांनी तर पटोलेंविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे, त्याला आता नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकाणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असे नाना पटोले म्हणालेत.
याबाबत बोलताना पटोले म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकाणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असे नाना पटोले म्हणालेत. विमानतळ विकले, समुद्र विकले, कंपन्या विकल्या आहेत, त्याविरोधात आम्हालाही कोर्टात जावं लागेल असे नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
पाटील विरूद्ध पटोले! माझ्या विरोधात जायचं तिकडं जा, आम्ही देश विकणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार
पाटील विरूद्ध पटोले! माझ्या विरोधात जायचं तिकडं जा, आम्ही देश विकणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार
घटस्फोट मृत्युपेक्षा जास्त वेदना देतो; १२ वर्षानंतर तुटलेल्या नात्यावर बोलला ‘महाभारताचा कृष्ण’
नाना पटोलेंना जेलची हवा खावी लागणार? भाजपने उचलले कडक पाऊल