Mumbai BEST Election Result : मुंबई (Mumbai city) व राजकीय वर्तुळात सध्या बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees Co-operative Credit Society) २०२५ च्या निवडणुकीचा निकाल चर्चेचा विषय बनला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचे उत्कर्ष पॅनल (Utkarsh Panel) आणि महायुतीचे सहकार समृद्धी पॅनल (Sahakar Samruddhi Panel) यांच्यात तीव्र स्पर्धा होणार, असा अंदाज होता. मात्र, सर्वांच्या अंदाजांवर मात करत शशांक राव (Shashank Rao) यांच्या पॅनेलने १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला ७ जागांवर विजय मिळाला.
१८ ऑगस्टला मतदान झाल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री निकाल जाहीर झाला. ठाकरे बंधूंच्या युतीसाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट म्हणून पाहिली जात होती, मात्र उत्कर्ष पॅनलला कोणतीही जागा मिळवता आली नाही. यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चिंता वाढली आहे, तर भाजप आणि महायुतीकडून ठाकरे बंधूंवर टीका सुरू झाली आहे.
शशांक राव कोण आहेत?
शशांक राव (Shashank Rao) हे मुंबईत (Mumbai city) कामगार संघटनांमध्ये सक्रिय असून अनेक आंदोलनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. ते मुंबई ऑटो रिक्षा युनियन (Mumbai Auto Rickshaw Union) आणि बेस्ट वर्कर्स युनियन (BEST Workers Union) चे प्रमुख आहेत. शशांक राव हे कामगार नेते शरद राव (Sharad Rao) यांचे पुत्र आहेत. आठ वर्षांपूर्वी त्यांच्या पदार्पणातच त्यांनी मोठ्या ऑटो रिक्षा युनियनच्या संपाचे नेतृत्व यशस्वीपणे केले. त्यांनी बेस्ट, बीएमसी, हॉकर्स, ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या कामगारांच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जनता दल युनाइटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला.
शशांक राव पॅनलचे विजयी उमेदवार (१४ जागा)
-
आंबेकर मिलिंद शामराव
-
आंब्रे संजय तुकाराम
-
जाधव प्रकाश प्रताप
-
जाधव शिवाजी विठ्ठलराव
-
अम्मुंडकर शशिकांत शांताराम
-
खरमाटे शिवाजी विश्वनाथ
-
भिसे उज्वल मधुकर
-
धेंडे मधुसूदन विठ्ठल
-
कोरे नितीन गजानन
-
किरात संदीप अशोक
-
डोंगरे भाग्यश्री रतन
-
धोंगडे प्रभाकर खंडू
-
चांगण किरण रावसाहेब
-
शिंदे दत्तात्रय बाबुराव
प्रसाद लाड पॅनलचे विजयी उमेदवार (७ जागा)
-
रामचंद्र बागवे
-
संतोष बेंद्रे
-
संतोष चतुर
-
राजेंद्र गोरे
-
विजयकुमार कानडे
-
रोहित केणी
-
रोहिणी बाईत