एपीएल अपोलो ट्युब्स ही कंपनी देशातील इलेक्ट्रिक रेझिस्टन्स वेल्डेड स्टील पाईप आणि सेक्शनची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भक्कम स्थान प्राप्त केले आहे, जगभरातील 20 हून अधिक देशांमध्ये या कंपनीच्या उत्पादनाची निर्यात होत असते. सध्या या कंपनीने ग्राहकांना दिलेल्या जबरदस्त परताव्यामुळे ती चर्चेत आली आहे.
एपीएल अपोलो ट्युब्स कंपनीच्या बहुविध उत्पादनांमध्ये प्रीगॅल्वनाइज्ड ट्युब, स्ट्रक्चरल ईआरडब्ल्यु स्टील ट्युब, गॅल्वनाइज्ड ट्युब, एमएस ब्लॅक पाईप आणि होलो सेक्शनच्या 1,100 हून अधिकांचा समावेश आहे. या कंपनीने दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
माहितीनुसार, 28 एप्रिल 2020 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत रु. 124.59 होती, जी 26 एप्रिल 2022 मध्ये म्हणजेच दोन वर्षांत रू.1043 पर्यंत पोहोचली. म्हणजेच गेल्या दोन वर्षांत त्यात 737टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा झाला आहे.
गेल्या वर्षी या स्टॉकमधील 1लाख रुपयांची गुंतवणूक आज 8.37लाख रुपये झाली. ही कंपनी एस अँड पी बीएसई 500 निर्देशांकात अव्वल आहे. अपोलो ट्युब्सने एस अँड पी बीएसई 500 निर्देशांकाद्वारे वितरीत केलेल्या परताव्याच्या तुलनेत 8 पट अधिक परतावा दिला आहे.
एपीएल अपोलो ट्युब्स कंपनी सध्या 50.88x च्या TTM PE वर व्यवहार करत आहे. तर कंपनी संबंधित असलेले क्षेत्र PE 6.49x आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कंपनीने 11.34% चे ROE आणि 13.77% ROCE देऊ केले आहे. अलीकडील तिमाहीत कंपनीची टॉपलाइन 24.95% ने वाढत 3,123.94 कोटी रुपये झाली.
तर बॅटमलाईन वार्षिक तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिस-या तिमाहीत 14% ने कमी होत ती रु. 127.88झाली. मुंबई शेअर बाजारात या समभागाचा गेल्या 52आठवड्यांचा उच्चांक आणि वर्षभराचा नीचांक अनुक्रमे रु 1,113.65 आणि रु 589 आहे. गुरुवारी सकाळी 10.20 वाजता एपीएल अपोलो ट्युब्स लिमिटेडचा शेअर रु. 1,033.50 वर व्यवहार करत होता.