Share

महावितरणच्या अधिकाऱ्याला संतप्त ग्राहकाकडून मारहाण, तुफान शिवीगाळ; पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्या एक व्यक्ती महावितरणच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अधिकाऱ्याला मारहाण केल्याने अनेकांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित घटना ही चाळीसगावमधील आहे. चाळीसगावमधील महावितरणचे कक्ष दोनचे सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना शहरातील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या धनराज अशोक पाटील या ग्राहकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. थकबाकी भरल्याचे कागदपत्रे मागितल्याने ही मारहाण करण्यात आली आहे.

घडलेली घटना म्हणजे, धराज पाटील याने थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांची भेट घेतली. यावेळी वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. मात्र, उकलकर यांनी त्याला कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.

यावर धनराज पाटील या ग्राहकाला प्रचंड राग आला आणि त्याने सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच धनराज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

याआधी देखील अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी वेळीवेळी शासकीय कर्मचाऱ्यांकडून समोर येत आहे. याही वेळी शासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.

सध्या येणारे वीज बिल पाहून सामान्य जनता संताप व्यक्त करत आहे. हा संताप महावितरणच्या अधिकाऱ्यांवर काढला जात आहे. आत्तापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये महावितरणच्या कार्यालयात जाऊन लोकांनी धिंगाणा घातला आहे, अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. मात्र, या सगळ्यात प्रामाणिक अधिकारी देखील पिसला जात आहे हे लक्षात घेणं महत्वाचे आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now