Share

मी निर्लज्जासारखी वाट पाहत उभी राहायचे आणि.., प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा किस्सा

Mrunal Thakur

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) लवकरच अभिनेता शाहीद कपूरसोबत ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २२ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून सध्या मृणाल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान नुकतीच एका मुलाखतीत बोलताना मृणालने सिनेसृष्टीतील तिच्या संघर्षाच्या काळावर भाष्य केलं आहे.

‘जर्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत बोलताना मृणालने सांगितले की, ‘मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगत आहे. मी लोकांच्या ह्रदयापर्यंत पोहोचू इच्छित आहे. ‘कुमकुम भाग्य’ने मला खऱ्या अर्थाने यासाठी मदत केली. लोकांचे मनोरंजन करत राहणे, हा माझ्या आयुष्याचा एकमेव उद्दिष्ट आहे’.

मृणालने पुढे म्हटले की, ‘मी नशीबवान आहे की मला ही संधी मिळाली. असे अनेक टीव्ही कलाकार आहेत जे या संधीची वाट पाहत बसले आहेत. मी खूप मेहनत केले. खूप संघर्ष केले. निर्लज्जपणे जाऊन मी ऑडिशनसाठी उभी राहत असत. आणि जोपर्यंत माझं ऑडिशन घेतलं जात नाही तोपर्यंत तिथेच बसून राहायची. मी खूप हट्टी होते आणि आताही तशीच आहे’.

https://www.instagram.com/p/CcCd56ItIbu/

दरम्यान, मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंत मजल मारली. २०१२ साली ‘मुझसे कुछ कहते हैं… ये खामोशियां’ या मालिकेद्वारे तिने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. परंतु, ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेतील बुलबुल या भूमिकेमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली.

छोट्या पडद्यानंतर मृणालने ‘लव सोनिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘सुपर ३०’, ‘बाटला हाऊस’ आणि ‘धमाका’ अशा चित्रपटात काम केले. तर लवकरच ती ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘पिप्पा’, ‘आँख मिचौली’ या चित्रपटाद्वारेही ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.instagram.com/p/Cb6tp3OljeW/

दरम्यान, ‘जर्सी’ हा चित्रपट २०१९ साली आलेल्या ‘जर्सी’ या तेलूगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तेलुगूमध्ये चित्रपटात ‘मख्खी’ फेम अभिनेता नानीने मुख्य भूमिका साकारली होती. तर आता हिंदीत अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटात शाहिद त्याचे वडिल पंकज कपूर यांच्यासोबत दिसणआर आहे. गौतम तिन्ननुरीकद्वारे दिग्दर्शित हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
मृत्यूच्या वेळी गर्भवती होती ‘ही’ अभिनेत्री; अमिताभ बच्चनसोबत ‘या’ चित्रपटात केलं होतं काम
रणबीर कपूरनंतर आता बहिण करिश्मा कपूरचं होणार लग्न? ‘या’ फोटोमुळे सुरु झाली चर्चा
१९ वर्षांच्या ‘या’ मराठमोळ्या पठ्याने एडिट केलीय यशची ३०० कोटींची मेगाबजेट फिल्म ‘KGF 2’ 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now