अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) नुकतीच काही दिवसांपूर्वी आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून यासंदर्भात तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती. मृणालच्या या बातमीनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर आता मृणालने तिच्या मुलीचा आणि पतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बापलेकीचे बॉन्डिंग दिसून येत आहे.
मृणालने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, मृणालचा पती नीरज मोरे त्यांच्या लेकीशी गप्पा मारताना दिसत आहे. बापलेकीचे हे सुंदर दृश्य मृणालने तिच्या कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ शेअर करत तिने मृणालने लेकीच्या येण्याने तिच्या घरात कसा बदल झालाय, हे सांगितलं आहे.
तिने लिहिले की,’.. आणि शेवटी नीरज बोलता झाला… नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही… भयंकर शांतता… पण आता सगळं बदलतंय.. !!’ यासोबत मृणालने #fatherdaughterlove #happylove असे हॅशटॅग दिले आहेत. मृणालच्या या व्हिडिओला अनेक लोकांनी लाईक करत आपली पसंती दर्शवली. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत नेहमी त्याचं कुटुंब असंच आनंदी राहो, अशा सदिच्छा देत आहेत.
दरम्यान, मृणालने या महिन्याच्या २४ तारखेला मुलीला जन्म दिला असून इन्स्टाग्रामद्वारे तिने चाहत्यांशी ही आनंदाची बातमी शेअर केली. मृणालने तिच्या आणि पती नीरजच्या हातात लेकीचा हात धरलेला फोटो शेअर करत लिहिले की, ‘वडिलांची लाडकी मुलगी आणि आईचे संपूर्ण विश्व असणाऱ्या… आमच्या छोट्या परीचे आगमन झाले’.
या पोस्टसोबत मृणालने तिच्या मुलीच्या नावाचीही घोषणा केली होती. तर मृणाल आणि नीरजने त्यांच्या मुलीचे नाव नुर्वी असे ठेवले. मृणालच्या या पोस्टनंतर तिच्यावर चाहते आणि सेलिब्रिटींनी लाईकचा वर्षाव करत कमेंटद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मृणालने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेद्वारे मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. या मालिकेत ती अभिजीत खांडकेकरसोबत दिसली होती. मालिकेतील अभिजीत आणि मृणालच्या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. या मालिकेनंतर ती ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मन बावरे’ यासारख्या मालिकेतही काम केले.
मृणालच्या पतीचे नाव नीरज मोरे असे आहे. नीरज मोरे हा मुळचा पुण्याचा असून तो नोकरीनिमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहे. २५ फेब्रुवारी २०१६ रोजी मृणाल आणि नीरजने लग्नगाठ बांधली होती. तर लग्नानंतर मृणाल पतीसोबत अमेरिकेतच राहू लागली.
महत्त्वाच्या बातम्या :
आलिया-रणबीरच्या लगीनघाईत समोर आली ऋषी-नीतू कपूरची ४२ वर्षांपुर्वीची पत्रिका, पहा फोटो
सलमान, शाहरूख आणि आमिरच्या ५ चित्रपटांना एका चित्रपटाने झोपवले, तुम्हीही म्हणाल, ‘डायरेक्टर नहीं फायर है’
स्वतःच्या मुलीसोबत रोमान्स करताना दिसला गणेश आचार्य, कॅमेऱ्यासमोर करू लागला ‘हे’ कृत्य