Share

उमरान आणि बुमराह मिळून इंग्रजांची बॅंड वाजवतील, काश्मिरी मुलाने जिंकले शशी थरूर यांचे मन

4 ओवर, 15 डॉट्स, 28 धावा आणि चार विकेट… हे गोलंदाजीचे आकडे त्या गोलंदाजाचे आहेत, ज्याला काही दिवसांपूर्वी काहीच लोक ओळखत होते, परंतु सध्या तो जगभरात खळबळ माजवत  आहे. आयपीएलमध्ये चमक दाखवणारा तुफानी वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. कोणी त्याला पुढचा शोएब अख्तर सांगत आहेत तर कोणी डेल स्टेन.(mran and Bumrah to play English band together)

काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor यांनी त्यांचा भारतीय क्रिकेट संघात लवकरात लवकर समावेश करण्याची वकिली केली आहे. उमरानची स्तुती करताना शशी थरूर यांनी ट्विट केले की, आम्हाला त्याची भारतीय जर्सीमध्ये गरज आहे. किती अद्भुत प्रतिभा आहे. ग्रीनटॉप कसोटी सामन्यासाठी त्याला इंग्लंडला घेऊन जा. तो आणि बुमराह एकत्र गोलंदाजी करून नक्कीच इंग्रजांना घाबरवणार! #उमरानमलिक.

रविवारी झालेल्या दुहेरी हेडरच्या पहिल्या सामन्यात 19व्या षटकाच्या अखेरीस पंजाबच्या खात्यात 6 बाद 151 धावा झाल्या होत्या. ओडियन स्मिथच्या उपस्थितीत शेवटच्या ओवरमध्ये किमान 160 पर्यंत पोहचणे अपेक्षित होते, पण ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर उमरान मलिकने स्मिथला पायचीत केले. खास म्हणजे या ओवरमध्ये एकही धाव त्यांना काढता आली नाही आणि पंजाबचा संपूर्ण संघही बाद झाला.

या ओवरमध्ये चार विकेट पडल्या, त्यापैकी एक धावबाद झाला. अशाप्रकारे उमरान हा आयपीएलमध्ये 20वी ओवर मेडन टाकणारा चौथा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी फक्त इरफान पठाण (2008), लसिथ मलिंगा (2009) आणि जयदेव उनाडकट (2017) हे करू शकले. एका सामन्यात दोन C&B असणारा हरभजन सिंग नंतरचा कॉट अँड बोल्ड करणारा दुसरा गोलंदाज उमरान मलिक ठरला आहे.

भारतीय युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला तुफान म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 22 वर्षीय सनरायझर्स हैदराबाद (SRH) या गोलंदाजाने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या IPL-2022 च्या 28 व्या सामन्यातील शेवटच्या षटकात आपल्या गतीने विरोधी संघाला गुढघे टेकवायला भाग पाडले.

महत्वाच्या बातम्या-
यंदा मुंबई इंडियन्स सर्वात कमकुवत टीम रोहित शर्मावर हा दिग्गज खेळाडू नाराज, बुमराहवरही केलं भाष्य
मुंबईला हारताना बघून रोहित शर्मावर संतापला हा दिग्गज खेळाडू; म्हणाला, जसप्रीत बुमराहच्या
मुंबईवर करो या मरोची स्थिती; प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आता फक्त ‘हा’ एकच मार्ग शिल्लक
मुंबईच्या सलग सहाव्या पराभवानंतर निराश झाला रोहित; म्हणाला, काय चूक होतेय माहिती नाही, पण

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now