Share

संसदेत बसून खासदार बघत होता पाॅर्न व्हिडीओ; बाजूच्या महीला खासदाराने तक्रार करताच…

संसदेत बसून एक खासदार मोबाईलवर अँडल्ट व्हिडीओ पाहत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे संसदेमधील महिला वर्ग प्रचंड संतापला असून, लवकरात लवकर संबंधित खासदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संसदेत एक पुरुष खासदार मोबाईलवर अँडल्ट व्हिडीओ पाहत असल्याची तक्रार एका महिला खासदाराने केली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तक्रारदार महिला खासदार ही त्या पुरुष खासदाराच्या शेजारी बसली असताना, तो असे अँडल्ट व्हिडीओ पाहत होता, असे तिनं सांगितले.

संबंधित घटना ही ब्रिटनमधील आहे. ब्रिटनमधील हाउस ऑफ कॉमंसमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरु होती, त्यावेळी एक खासदार आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहत होता. त्याचं पूर्ण लक्ष हे मोबाइलमध्ये होतं. तो अश्लील व्हिडीओ पाहण्यात दंग होता.

माहितीनुसार, हा व्यक्ती ब्रिटनमधील कंजरवेटिव्ह पार्टीमधील एक नेता आहे. त्याचं नाव अद्याप समजलं नाही. मात्र, हा मंत्री लोकांच्या समस्या न मांडता संसदेत अश्लील व्हिडीओ पाहण्यात दंग होता, त्यामुळे त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी संसदेतील महिला खासदारांनी केली.

युनायटेड किंडम ट्रेझरीचे संसदीय सचिव Chris Heaton-Harris यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. माहितीनुसार, खासदारावर करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी एक विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे.

आयरलँडचे मिनिस्‍टर कोनोर बर्न्‍स यांनी देखील या प्रकरणी दखल घेतली असून, संबंधित खासदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ब्रिटनच्या संसदेत अशी घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी देखील असाच काहीसा प्रकार समोर आला होता. मात्र वारंवार अशा घटना समोर येत असल्याने जनतेकडून राग व्यक्त केला जात आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now