mp nusrat jahan viral photo | खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अभिनेत्री सुद्धा असल्यामुळे अनेकदा ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर करत असते. तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत येत असते. ती दररोज एकापेक्षा एक सुंदर फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुसरत प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये नुसरतची सिझलिंग स्टाईल पाहायला मिळत आहे. नुसरतने इंस्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहे. येथे तिने मल्टी-कलर क्रॉप टॉप घातला आहे, ज्याची गाठ उघडलेली असून ती आतील गुलाबी ब्रा दाखवताना दिसत आहे. तिने न्यूड मेकअप आणि स्मोकी आय लूकसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
तसेच या फोटोंमध्ये दिसून येते की, अभिनेत्रीने हुप इअरिंग्ज घातल्या आहेत. तसेच केसांची स्टाईल ही पोनीटेल बनविली आहे. या लूकमध्ये नुसरत खूपच हॉट दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे हे फोटो खुप व्हायरल होत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनाही फार आवडले आहे. तिचा फोटो पाहून चाहत्यांनीही तिचे कौतूक केले आहे. कोणी तिला ब्युटीफुल म्हटले, तर कोणी तिला गॉर्जियस म्हटले आहे.
नुसरतचा हा लूक पाहून ती एका मुलाची आई असल्याचा अंदाज लावता येत नाही. आजही तिने स्वत:ला खुप फिट ठेवले आहे. नुसरतचे चाहते तिच्या फिटनेसने अनेकदा कौतूक करताना दिसतात. तर तिचे काही चाहते तिच्या स्टाईलची कॉपी करताना दिसून येतात.
नुसरत दररोज तिच्या फोटोशूट आणि व्हेकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर टाकत असते. नुसरत तिचे लग्न आणि नातेसंबंधांमुळे खूप वादात सापडली आहे. तुर्कस्तानमध्ये बिझनेसमन निखिल जैनसोबत लग्न केल्यानंतर नुसरत जहाँ ही चांगलीच चर्चेत आली होती.
त्यानंतर नुसरतला मुलगा झाला तेव्हा हा मुलगा निखिलचा नसल्याचे समोर आले होते. हा मुलगा अभिनेता यशदास गुप्ताचा असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. निखिल जैनपासून विभक्त झाल्यानंतर सध्या नुसरत जहाँ यशदास गुप्ता आणि तिच्या मुलासोबत कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे.
महत्वाच्या बातम्या-
टॅटू गोंदवल्यामुळे १४ जणांना झाला एड्स; कसा घडला हा भयानक प्रकार?वाचून हादराल
Katrina Kaif: कतरिना कैफ बनणार आई? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडिओ व्हायरल होताच, चाहते म्हणाले…
Shahrukh khan: एकेकाळी शाहरूखच्या वाॅचमनने हाकलून दिले, आता त्याच शाहरूखसोबत करणार काम; मराठी अभिनेत्याने सांगीतला किस्सा