बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी आज चेन्नईमध्ये निधन झाले आहे. त्यामुळे बॉलिवूड विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राव यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना चेन्नईमधील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
याबाबतची माहिती अभिनेता अनुपम खेर यांनी ट्विट करत दिली आहे. ‘अनुभवी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि प्रिय मित्र टी रामा राव यांच्या निधनाबद्दल समजल्यावर खूप दुःख झालं. मला त्यांच्यासोबत ‘आखरी रास्ता’ आणि ‘संसार’मध्ये काम करण्याचं सौभाग्य लाभलं. या दुःखात मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. शांती!’ असे खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीले आहे.
https://twitter.com/AnupamPKher/status/1516614242698334212?t=LvDVDinwu040TnEKmXixJg&s=19
राव यांनी आपल्या कार्यकाळात अभिनेता अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिक तयार केला आहे. राव यांनी १९६६ ते २००० काळात अनेक हिंदी आणि तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यासोबतच त्यांना कित्येक लोकप्रिय चित्रपटांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
सुरुवातीच्या काळात राव यांनी चुलत भाऊ तातिनेनी प्रकाश राव आणि कोटय्या प्रत्यागत्मा यांच्यासोबत कलाविश्वात पदार्पण केले होते. सर्वप्रथम त्यांनी लहान मोठया तेलगू , हिंदी चित्रपटांच्या दिग्दर्शनाचे काम हाती घेतले. या कामात यश आल्यानंतर त्यांनी मोठ मोठ्या चित्रपटांचे काम हाती घेतले.
१९७७ मध्ये राव यांनी ‘यमगोला’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या काळात या चित्रपटाला सर्वात जास्त पसंती मिळाली होती. यानंतर त्यांनी ‘जीवन तरंगल’, ‘अनुराग देवता’ आणि ‘पचानी कपूरम’ चित्रपटांचे काम केले. ‘एक ही भूल’, ‘मुझे इंसाफ चाहिए’ आणि ‘नाचे मयूरी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील राव यांनीच आहे. आज राव यांच्या निधनानंतर बॉलिवूड विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
भाजपा नेत्याचा घरचा आहेर; ‘आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास नरेंद्र मोदी अपयशी’
चहलने हॅट्रीक घेताच धनश्री वर्माने सुरु केला डान्स, आनंदाच्या भरात मैदानातच…; व्हिडिओ झाला व्हायरल
राज ठाकरेंना फुले, शाहू आंबेडकरांची अँलर्जी का? राष्ट्रवादीचा परखड सवाल
KGF 2 ब्लॉकबस्टर होताच संजय दत्तचे पालटले नशीब, आता ‘या’ दिग्दर्शकाशी केली हातमिळवणी