लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलीने आईची केली हत्या; असा रचला होता ‘कट’, तपास करणारे पोलीसही चक्रावले

आई – लेकीच नात हे जगातील सर्वात आपुलकीच असतं. मात्र याच नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या लेकीने आपल्या वृद्ध आईची हत्या केली आहे. या घडल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला अटक केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धक्कादायक घटना दिल्लीतील आंबेडकरनगर परिसरात घडली आहे. १९ फेब्रुवारी रोजी एका महिलेची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाणून पहाणी केली असता तेव्हा ५५ वर्षीय महिला सुधा रानी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना दिसला.

याबाबत पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला विचारले असता तिने सांगितले की, रात्री सुमारे ९ वाजून ३० मिनिटांनी दोघे जण घरी आले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. त्यांनी आईच्या घरातील रोकड आणि दागदागिने लुटले आणि मारहाण करून ते फरार झाले. त्यानंतर मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी तसा तपास केला.

मात्र खोटी माहिती देऊन मुलीने पोलिसांची दशाभूल होती. पुढील तपासासाठी तोपर्यंत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिल्ल्या माहितीनुसार हा मृतदेह पाहून महिलेला जास्त प्रतिकार करता आला नाही, असे दिसले असल्याच पोलिसांनी सांगितले. त्यानंतर वेगाने पोलिसांनी तपास सुरू केला.

चौकशीसाठी मुलीला पुन्हा पोलिसांनी बोलावून घेतले असता मुलीनेच आईची हत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची मुलगी देवयानी हिचा विवाह झाला होता. तिला चार वर्षांचा मुलगा आहे, मात्र ती पतीला सोडून शिबू नावाच्या एका तरुणासोबत राहू लागली होती.

तसेच पुढे चौकशीदरम्यान मुलीने तोंड उघडले. आईच्या हत्येसाठी रचलेला प्लान पोलिसांना सांगितला आणि पोलिसही चक्रावून गेले. तिने सांगितले की, आईने पतीसोबत न राहिल्यास प्रॉपर्टीमधून काढून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच तिने पैसे देणेही बंद केले होते. त्यामुळे मी लिव्ह इनमधील मित्र शिबू त्याचा मित्र कार्तिकसोबत आईच्या हत्येचा कट आखला. आणि आईची हत्या केली.

महत्त्वाच्या बातम्या
पतीने पत्नीचे हात-पाय बांधून शारिरीक संबंध प्रस्थापित केले, कोर्टाने दिला ‘हा’ आदेश
”शरद पवारांच्या सावलीत उभं राहण्याची ज्यांची लायकी नाही, ते विचारतात शरद पवारांनी काय केलं?”
भैय्यु महाराजांच्या आत्महत्येच्या प्रकरणात भक्तांनी केली ‘ही’ मागणी, आरोपी हायकोर्टात
भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड ‘या’ मराठी अभिनेत्रीला करतोय डेट, वाचून अवाक व्हाल