गरिबीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेल्या घटना आपण पाहिल्या असतील. कोरोना महामारीत देखील अनेकांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. नागरिकांनी शहर सोडून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
अशीच एक घटना झारखंडच्या गुमला जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. गरीबीमुळे जन्मदात्या आईवर आली बाळाला विकण्याची वेळ आली आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना वाचून तुमच्याही काळजाचा नक्कीच ठोका चुकेल. तर जाणून घेऊ नेमकं असं काय घडलं? की या महिलेवर पोटचा गोळा विकण्याची वेळ आली.
ही घटना आहे झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील.. गुमला शहरातील आंबेडकर नगरमध्ये राहणारी गुडीया देवीने गरिबीमुळे आपल्या पोटच्या गोळ्याची विक्री केली. गरीबीमुळे गुडीयाची दोन मुलं पाटणाजवळील बिहटामध्ये वीट भट्टीवर काम करतात.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती मिळेल ते काम करून पैसे कमावतो. तो कधी कधीच घरी येतो. गुडीयाकडे राहण्यासाठी घर नाही. तसेच खायला अन्नही नाही. त्या परिसरातील लोकच तिला आणि तिच्या मुलीला खाण्यासाठी काहीना काही तरी आणून देत असतात.
मिळालेल्या माहितीनुसार, गुडीयाला तिसरी मुलगी 3 वर्षांची आहे. पण आता चौथ्या बाळाला गुडीयाने विकलं. गुडीयाने 2 चिमुकल्यांना शहरात सोडलं तर नवजात बाळाला 5 हजारांत विकलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिने या बाळाला जन्म दिला होता. या घटनेवरून आपलीला गरिबीची भीषणता किती भयानक असते यांची जाणीव होईल.
दरम्यान, याबाबत गुडीयाला विचारले असता तिने सांगितले की, आंबेडकर नगरमध्ये एक भंगाराचं दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर शेडखाली गुडीया देवी आपल्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन राहते. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांपासून गुडीया टीबीच्या आजाराने त्रस्त आहे. गुडीयाला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र ती हॉस्पिटलमधून पळून गेली.
महत्त्वाच्या बातम्या
दुचाकीने परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडलं विपरीत; मैत्रिणीच्या डोळ्यादेखत चिरला गळा
दक्षिण मुंबईतुन १३ मिनीटांत नवी मुंबई एअरपोर्टला जाता येणार; गडकरींनी सांगितली भन्नाट ट्रिक
माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच, पंतप्रधानांकडे तक्रार करणार – किरीट सोमय्या
‘सोमय्या जाता-जाता स्वतः पडले; त्यांनी नौटंकी करू नये’