Share

आईच्या नावाला काळीमा! मुलगा झोपेत असताना परकरच्या नाडीने आवळला त्याचा गळा, अंत्यविधीही केला, नंतर..

junnar

दररोज आपल्या आजूबाजूला धक्कादायक घटना घडत आहेत. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ही म्हण आपल्याला चांगलीच परिचयाची आहे. भावणेच सख्ख्या भावाची हत्या केल्याच्या अनेक घटना आपण वाचल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी तर वडिलांनी पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

तर आता अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. चक्क जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आईने रुग्णालयात खोटे कारण सांगत घडलेली माहिती लपवली आणि मुलाचा अंत्यविधी देखील या आरोपी आईने केला.

ही घटना आहे जुन्नर तालुक्यातल्या येडगाव जवळच्या परिसरातील. अनैतिक संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याने आईने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जातं आहे. ही घटना जाणेवारी महिन्यातील आहे. 20 जानेवारी 2022 रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी महिलेने आपल्या 13 वर्षीय मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळला. यावेळी मुलगा झोपेत होता.

विद्या कदम असे आरोपी महिलेचे नाव आहे. उपचारासाठी स्वतः आरोपी आईनेच ससून रुग्णालय पुणे येथे मुलाला नेले. रुग्णालयात उपचार सुरू असताना या मुलाचा 27 जानेवारी 2022 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात मुलाचे वडील सचिन शंकर कदम यांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी याबाबत फिर्याद दिली आहे.

दरम्यान, मृतक मुलाचे कागदपत्र पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक तपास करताना आणि कागदाचे अवलोकन करता प्रथमदर्शनी सदर मुलाचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांना संशय आल्याने विद्या कदमला चौकशीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनला बोलावले होते. यावेळी तिने स्वतःच्या मुलाचा परकरच्या नाडीने गळा आवळुन खून केल्याची कबुली दिली. सध्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जन्मदात्या आईने मुलालाची हत्या केल्याने सर्वानाच जबर धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
लग्नाला जाणारं संपूर्ण कुटुंब संपलं; नवरदेवासह 9 जणांचा मृत्यू, अपघातचा थरार वाचून तुमच्या अंगावर उभा राहिलं काटा
याला म्हणावं शिवभक्त! पठ्ठ्यानं घरावरच बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, तरुणांना दिला मोलाचा सल्ला
‘जय भवानी’ घोषणेचे उद्गाते डॉ. बाबासाहेब आंबेडकरच, लेटरहेडवरही भवानीचे चित्र; प्रकाश आंबेडकरांचा दावा
गावचा गाडा हाकताना संसाराचा गाडा झाला सुरू; सरपंचासोबत उपसरपंच अडकले विवाहबंधनात, वाचा इंटरेस्टिंग स्टोरी

क्राईम इतर

Join WhatsApp

Join Now