१४ एप्रिल रोजी बॉलिवूडमधील सर्वांत क्यूट कपल असणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचा विवाहसोहळा अगदी धुमधडाक्यात पार पडला. या विवाहसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक खास सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सर्वांचे लक्ष फक्त या क्यूट कपलनेच वेधून घेतले होते. मात्र यासगळ्यात आलियाच्या सासूबाईंचा थाटच वेगळा होता.
आपल्या मुलाच्या लग्नात नीतू कपूर सर्वांत सुंदर दिसत होत्या. त्यांच्यासोबत मुलगी रिधीमाने देखील सजण्यासवरण्यात कोणतीच कमी ठेवली नव्हती. आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे नुकतेच काही खास फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नीतू कपूर आणि रिधीमा कपूर उठून दिसत आहेत.
आपल्या मुलाच्या लग्नात नीतू कपूर यांनी गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा तर रिधीमाने सोनेरी रंगाचा घागरा घातला होता. या पेहराव्यावर दोघींनी मॅचिंग कलरचे दागिने घातले होते. मुलाच्या लग्नात नीतू कपूर सर्वांत आनंदी दिसत होत्या. त्यांनी कॅमेरासमोर येऊन फोटो काढण्यास कसलाही नकार दिला नाही.
त्यांच्यासोबत रिधीमाने देखील सर्वांनसमोर आलियाचे कौतुक केले आहे. आपली वहिनी खूपच गोड असल्याची प्रतिक्रिया यावेळी रिधीमाने दिली. दरम्यान आपल्या भावाच्या लग्नात दोन दिवसांपूर्वीच रिधीमाने हजेरी लावली होती. तर नीतू कपूर देखील लग्नाच्या तयारीत व्यस्त असलेल्या दिसून आल्या.
बॉलिवूडमधील सर्वांत फेसम कपल विवाहबंधनात अडकल्याचा आनंद सर्वांनाच झाला आहे. सोशल मिडीयावर या दोघांच्या लग्नाचे तुफान फोटो व्हायरल झाले आहेत. आलिया आणि रणबीरवर तर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्यासोबत बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी देखील या दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
यंत्रणा आमच्याविरोधात कितीही वापरली, तरीही कोर्ट आमच्यासाठी; भाजप आमदाराचे हैराण करणारे वक्तव्य
पुण्यात ‘या’ ठिकाणी राज ठाकरेंच्या उपस्थितीत पहिले हनुमान चालीसा पठण, ‘हिंदुजननायक’ म्हणून ठाकरेंचा उल्लेख
‘मेरी आवाज हिंदुस्थान की आवाज’, पोलिस कोठडीतून बाहेर येताच सदावर्तेंनी दिल्या मोठमोठ्याने घोषणा