Share

थाट असावा तर असा! सासूने जावयासाठी बनवले तब्बल १७३ पदार्थ, ४ दिवसांपासून करत होत्या तयारी

andhra pradesh

भारतात जावयाचा आपल्या सासरी एक वेगळाच थाट असतो. मुलीच्या पतीला कुटुंबात खुप आदर दिला जातो. देशाच्या प्रत्येक ठिकाणी हे केले जाते. कुटुंबातील सदस्य आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जावयाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात.

जावयाला सासू-सासूऱ्यांनी खास भेट दिली अशा बातम्या अनेकदा समोर येत असतात. पण आता आंध्र प्रदेशमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशात पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एका सासूने आपल्या जावयासाठी चक्क १७३ पदार्थ बनवले आहे.

आपल्या जावयाच्या स्वागतासाठी सासूने हे पदार्थ बनवले असून विशेष म्हणजे सासूने सर्वच्या सर्व पदार्थ आपल्या हाताने बनवले आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम गावातील हे प्रकरण आहे. टाटावर्ती बद्री हे तेथील व्यापारी असून त्यांच्या घरी एवढे पदार्थ बनवण्यात आले आहे.

टाटावर्ती बद्री यांनी हैद्राबाद येथे राहणाऱ्या आपल्या जावई पृथ्वीगुप्त चावला आणि मुलगी श्री हरिका यांना संक्रांतीच्या निमित्ताने घरी बोलावले होते. त्यामुळे आपल्या जावयाच्या स्वागतासाठी सासूने चक्क १७३ पदार्थ तयार केले होते.

या खास स्वागतावर बोलताना बद्री म्हणाले की, माझी मुलगी हरिका आणि जावई पृथ्वीगुप्त कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आमच्या घरी येऊ शकले नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपासून आम्हाला त्यांच्यासोबत संक्रांतीचा सणही साजरा करता आला नव्हता. पण यावेळी आम्ही हा सण एकत्र साजरा केला आहे.

१७३ पदार्थ बनवण्यासाठी बद्री यांच्या पत्नी संध्या यांनी खुप खास तयारी केली होती. त्यासाठी त्या चार दिवसांपासून स्वयंपाकघरात काम करत होत्या. त्या पदार्थांमध्ये बाजरी, पुरी, कारलं, हलवा, पापड, लोणचे, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक अशा तब्बल १७३ पदार्थांचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-
भाषेत शुद्ध अशुद्ध असं काही नसंत, भाषेचा हेतू शुद्ध ठरवणं नसून…; प्रमाण भाषेचा आग्रह धरणारांना नागराजने खडसावले
गुगलने नवी मुंबईत भाड्याने घेतली जागा; महीन्याच्या भाड्यात तुमच्या अख्ख्या गावाची घरे बांधून होतील
सिंकदरच्या कुस्तीचा निकाल देणाऱ्या पंचांना खरच दिली धमकी? अखेर सिकंदरने समोर आणले सत्य

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now